ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्याच्या ठिकाणाहून साधारण विस एक किमी.अंतरावर असणारे पोई हे निसर्ग सौंदर्याने नटलेले एक आदर्शगाव ,गावातील लोकांचा पारंपरिक व्यवसाय शेती.गावची लोकसंख्या सतराशेते आठराशेच्या घरात,गाव वीजेने उजळला ते1982 मधे.त्यावेळी गावात वेसनधिनतेच्या आधिन बरीच मंडळी गेली होती.त्यावेळी ग्रामस्थांची बैठक झाली व एकमुखाने निर्णय "दारुबंदीचा" झाला.आज या घटनेला चौतीसवर्ष झाली.आजून दारुबंदीच आहे.कोणीही दारुबनविण्याचा विचार केला नाही वा विकण्याचा विचार केला नाही.या गावाचा आदर्श आजुबाजूच्या गावातील लोकांनी घेऊन शेजारच्या पंचक्रोशीत दारुबंदीची हाक ग्रामस्थांनी दिली आहे.
दुसरी गोष्ट गावात शूद्रअशुद्र असा भेदभाव होता दलितांवर खूप आन्याय कारक गोष्ट लादली होती.दलितांसाठी वेगळा पानवठा होता.लोकांच्या घरातसुध्दा त्यांना प्रवेश नव्हता.कुठल्याही डबक्यातील पाणी हा समाज पीत होता ; किंवा " पाणी वाढ गं माय"अशी केविलवाणी अवस्था या समाजाची होती.गावातील सृजान नागरिकांनी निर्णय घेतला आणि खरी दलित मुक्तीची पहाट गावाने पाहिली. पानवठे दलितासाठी मोकळा झाला. पोईत घडते त्याचे अनुकरण आजुबाजुच्या गावात घडते असंच यावेळी ही झाले.खर्या मानवतेचे दर्शनगावाने घडविले.
नव्वदच्या दशकात गाव आजच्या एवढे समृद्ध नव्हते.पावसावर आधारीत शेती ,वर्षातून एकदाच पीक घेतले जायचे.त्यामुळे कमालीचे दारिद्र्य गावत होते.त्यात लग्नसमारंभात खर्च करण्याची प्रथा समाजात होती." कर्ज काढून लग्न केली जायची"यावर कमालीचा तोडगा ग्रामस्थांनी काढला सामुदायिक विवाहसोहळ्याचे ग्रामस्थांनी आयोजन केले .वर्षभर जमलेली लग्न एकाच मंडपात एका वेळी,आगदी कमी खर्चात गावाने पार पाडली.त्यामध्येच गरीब श्रीमंत सहभाग घेऊन मानवतेचे पाईक झाले.एकाच मंडपात वीसबावीस जोडप्यांचा विवाहसोहळा कोणतीही गडबड गोंधळन होता.दहाहजार लोकांना एकत्र पंगतीत बसून गावाने शांततेत जेवण दिले.असे कितीतरी लग्न सोहळे गावाने आयोजित केले होते.
पावसावर आधारीत शेती.त्यामुळे दारिद्र्यरेषेखालचा समाज फार मोठा.घरातील एखाद्या व्यक्तीचे निधनानंतर घरावर अचानक दशक्रीयाविधिच्या आर्थिकसंकटाला समोर्या जावे लागे.यावर ग्रामस्थांनी उपाय शोधून काढला.मयत व्यक्तीच्या नातलगांला दोन किलो तांदुळ व पाच रुपये अशी आर्थिक मदत प्रत्येक कुटुंबाने करायची 1985 पासून 2005 पर्यंत ही प्रथा गावात होती .
गाव हे वनराईने नटलेले आहे . परंतु इंधनासाठी जंगलाची बेसुमार कत्तल झाली.आणि सार्या जंगलात आवकळा आली.डोंगर उघडे बोडके झाले.गर्दवनारिई ऐवजी उदासओसाड वाळवंट सर्वत्र दिसू लागले.ग्रामस्थां जागृत झाले ,आणि एकमुखाने " कुर्हाडबंदिचा " निर्णय 1995 झाला.शासनाने ही या हाकेला साद दिली.आणि "संयुक्त वनव्यवस्था समिती"स्थापन झाली.आणि खर्या अर्थाने गावच्या विकासाला सुरुवात झाली.आणि गावापासून हाकेच्या अंतरावर वाहणारी" बारवी "नदीतून पाणी पाईप लाईन मधून गावातील शेतीला आणण्याचा मार्ग मोकळा झाला.आज गावातील बांधव दुबर पिक घेत आहे.भातशेतीनंतर उन्हाळ्यात भेंडीचे पीक व्यापारी तत्वावर घेतले जात आहे."पोईची भेंडी" युरोप अखाती देशांच्या बाजारपेठा सजवत आहे.यातून नागरिकांना मोठ्या प्रमाणात अर्थाजन होत आहे.दारीद्रयरेषेवर जगणार्याची लोकसंख्या 90 वरून 8,9,%वर आली आहे.गावातील लोक यालाच " हिरवाईचा आशीर्वाद "असे म्हणतात.आज गाव समृद्ध आहे. आज गावत चौदाशे हेक्टर भूक्षेत्रावर ग्रामस्थांनच्या सहकार्यने जंगलाची राखण केली जात असून "संत तुकाराम" पुरस्कार गावाने पटकावला आहे.आता प्रतिक्षा आहे ती संपूर्ण महाराष्ट्रातून एक नंबरचे जंगल पुरस्कार . गावत वारकरी सांप्रदायिक परंपरा जोपासली जाते.बहुसंख्य नागरिक शुध्द शाकाहारी आहेत.यात तरुणांचा सहभाग वाखाणण्याजोगा आहे.नागरिकावर आध्यामिक पगडा फार आहे.वारकरी सांप्रदायाच्या जोडीला स्वाध्याय परिवार,स्वामी समर्थ परिवार.याचे ही योगदान आहे.त्यामुळे गावातील लग्न एकदम साध्या पध्दतीने पार पडतात.पंचक्रोशीत हळदीसमारंभ जळोषात साजरे केले जातात दारु मटण अशा प्रथा असतांना पोईच्या इतिहासात अजून एकदा ही दारूमटणाच्या हळदीसमारंभ झाले नाही.गावातील ग्रामस्थ दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करतात.त्यामुळे सामाजिक एकोपा रहण्यास हातभर लागतो.काकडआरती;तुकाराम बीज हनुमान जयंती वर्षीतून दोनदा गावातील नागरिकांच्या वतीने सत्यनारायणाची महापुजा.भागवतसप्तह इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.सर्व सण आणि उत्सव गावात एका ठिकाणी साजरे केले जातात.
गांवचे नाव पोई" पोई "या शब्दाचा संस्कृत मधे " पाण्याच झरा "असा अर्थ होतो.त्याप्रमाणे गावत नागरिकांनी स्वतंत्र गटातगटात आपआपली नळपाणी योजना राबवून एक आदर्श निर्माण केला आहे.त्यामुळे गावला कधीच पाणी टंचाईलातोंड द्यावे लागत नाही.संपूर्णगावत शोष खड्डे असून गाव स्वच्छ आणि सुंदर असते. संत गाडगेबाबा पुरस्कार जरी गावाला मिळाला नसला तरी गाव स्वच्छआहे.
गाव कलाप्रिय असून गावत "हनुमान नाट्यमंडळ पोई"हे हौशी नाट्यमंडळ ग्रामउत्सवाला पूर्वी नाटक सादर करत होती.1960 पासून नाटक मंडळ दरवर्षी ही परंपरा चालू होती "जावळीचा झुझार " जाग मराठ्यां जाग" "सह्याद्रीचा सिंह" एकच प्याला" साक्षात्कार" आदी ऐतिहासिक सामाजिक या विषयावर नाटक होत होती.कसलेल्या कलाकारालाही लाजवतील असे कलाकार या गावात जन्माला आले.पिढीजात भजनाची कला या मातीतने जोपासली आहे.शहरीकरण होत असूनही अजून या गावात लग्नाच्या पंगती बसतात.आगला वेगळा "टिपरी नृत्य"आख्या जिल्हात फक्त याच गावात खेळाला जातो.अजून एक कला या मातीत आहे.भजनी भारुड सादर करणारे कलाकार येथे आहेत.करमणूकीची कोणतीही साधने जेंव्हा येथे नव्हती तेंव्हा याच कलाकारांनी तालुक्याच्या बाहेर जाऊन या कलाकारांनी लोकांना खळखळून हसवले.याच गावातील कीर्तनकारांनी समाजजागृतीची पताका खांद्यावर घेऊन भागवत धर्माचा प्रचार केला.
पण आता या सार्या गोष्टी पुढील पिढी जसंच्या तसं पुढे नेईल काय ?मी शाशंक आहे.सध्या राजकारणांने गाव पोखरली जात आहे.नविन पिढी स्वार्थी होत आहे "मला काय त्याचे "?वृत्ती वाढत आहे.जुने जाऊद्या मरणा लागून गाडून किंवा पुरुन टाका.अशा वृत्तीचे जोम वाढत आहे.संस्कृतीची पर्वा कुणाला ?गरीबांनी मजबुरी म्हणून संस्कृती जपायची आणि धनदांडग्यानी तिचा कडेलोट करायचा.आमची पिढी भाग्यवान कारण या गावच्या संस्कृतीचे सोहळे आम्ही पाहिले आणि अनुभववले.आमची पिढी गरीब होती ;पण जे पाहिले अनुभवले ते पराकोटीचं होतं.आजची पिढी श्रीमंत आहे ;पण आम्हाला जे मिळाले ते त्यांना पैशाने ही नाही मिळणार.
श्री.धनाजी बुटेरे
मु.पोई ; पो.वाहोली.
ता.कल्याण जि.ठाणे. 421301
📞9930003930