सामर्थ्य आहे चळवळींचे
विविध क्षेत्रांतील चळवळीनी नेमकी काय केले?
"सामर्थ्य आहे चळवळींचे जो जे करील तयांचे ."असे संत रामदास स्वामी म्हणतात.खरोखरच चळवळी मध्ये सामर्थ्य आहे.आज असंख्य वेगवेगळ्या क्षेत्रामधे. आपल्या न्याय व हक्कासाठी तसेच समाज उत्थान. घडविणा-या चळवळी उभ्या आहेत. त्या किती प्रमाणात स्वतःशी प्रामाणिक आहेत या यक्ष प्रश्न आहे. जेंव्हा चळवळ उभी रहाते उद्देश फार प्रामाणिक असतो. पण नंतर चळवळ वेग घेऊ लागली की चळवळेतील नेते मंडळी सरकार च्या दावणीला
बांधले जातात,किंवा विकले तरी जातात .चळवळ उरते नावा पुरती.शरद जोशींची शेतकरी वर्गाच्या हितासाठी शेतकरी संघटनेची बांधणी केली.तिचा परिणाम ही दिसू लागला.पण कुठे पाल चुकचूकली कुणास ठाऊक? .नवीन संघटना तयार झाल्या नि चळवळ पुढे सरकू शकली नाही. खरे तर सर्वात असंघटीत घटक म्हणजे शेतकरी. असंख्य मागण्या आहेत त्याची ही गरज आहे. पण शेतकरी एकसंघ राहू शकला नाही. परिणामतः सरकायचं फावलं नि शेतकरी देशोधडीला लावलं.कामगार हितासाठी संघटना हवीच पण असंख्य संघटना त्यामुळे कामगार आजही असंख्य मागण्या पासून उपेक्षित आहे. काही कामगार नेते सरकारचे मांडलिक झाले. आणि चळवळीची वाट लागली. आज सरकार विरोधात निघणारे मोर्चे कष्टकरी वर्गात किती असंतोष आहे. हे संगतात.
विद्यार्थी चळवळ अपेक्षित यशस्वी झाल्या नाहीत. या चळवळी राजकीय पक्षांचे स्टॅप घेऊन. उतरू लागल्या. परिणामतः विद्यार्थी चळवळ ही हवी त्या गतीने पुढे जाऊ शकली नाही. प्रस्थापित सरकार विरुद्ध विद्यार्थी असाच संघर्ष पाहायला मिळतो .त्यात विद्यार्थी राजकीय झेंडे घेऊन उतरले."विरोधासाठी विरोध.की गरजेसाठी विरोध." हे एक कोडे आहे.राजकारणी विद्यार्थ्यांचा अपमतलब म्हणून वापरू लागले.
साहित्यात ही चळवळी आल्या. जाती धर्मानुसार पुढे प्रवाह वाढले.प्रांतिय स्वरूप प्राप्त झाले. मग पुन्हा. विदर्भ, मराठवाडा, कोकण,यामध्ये वेगवेगळे गटतट तयार झाले.खरे तर साहित्य चळवळी वाढणे म्हणजे समाज उत्थान घडविणे हा मुख्य उद्देश होता. त्यातून वैश्विक साहित्याची निर्मिती व्हावी.जनमानसात साहित्याची चर्चा व्हायला हवी पण तसे होताना दिसत नाही. काही साहित्य चळवळी केवळ नावापुरत्या आहेत. काही पुरस्कार देण्यापुरत्या बरं पुरस्कार लायक साहित्यिकाला द्यावा पण येथे वशिल्याने पुरस्कार वाटले जातात. काही चक्क विकतात.नि दस्तूरखुद्द आमचा साहित्यिक ते पुरस्कार विकत घेतात सुध्दा. काही साहित्यिक संस्था आपल्या जवळच्या साहित्यिकाला पुरस्कार वाटतात.तू ओळखिचा तू जवळचा असे पुरस्कार स्वतःची आणि चळवळीची हानी करून घेतात.चळवळीचा उद्देश दूर रहातो नि चळवळ वांझोटीच रहाते.
मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेना ही राजकीय चळवळ उदयास आली. काही अंशी मराठी माणसांना ती आपली वाटली.पण चळवळीचा हवा तसा मराठी माणसांनी हात दिला नाही. त्यातून ही राजकीय चळवळ.कुणाला रुचली.कुणाला पचली नाही.राजकीय चळवळ त्यामुळे सगळ्या मराठी माणसांचा पाठींबा लाभला नाही. आणिआपणा सर्वांना महीत आहेच पुढे काय झाले? त्या ही पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही राजकीय चळवळ मराठी माणसांच्या हक्कासाठी नवीन पक्ष म्हणून उभी राहिली.येथे ही मराठी माणूस या चळवळी पासून दूर गेला.राज ठाकरे या मराठी माणसांला ऐकायला लोक लाखोच्या संख्येने येतात पण मतपेटी मात्र रिकामी रहाते.येथे राज ठाकरेंना मत दिले म्हणजे चळवळ यशस्वी झाली असं मला म्हणायचे नाही. तर किती मराठी अस्मितेचे प्रश्न सुटतात या वर या चळवळीचे यशापयश अवलंबून आहे.
थोडक्यात काय चळवळींचे यशापयश. त्यात काम करण्या-या कार्यकर्त्यांच्या हातात आहे.पुरस्कारा.दिल्याने ती संस्था मोठी होत नाही. तर ती व्यक्ति त्या संस्थेला मोठी करते. दिडदमडीला जे कामगार नेते विकले जातात. त्या कामगार चळवळींचे भविष्य अंधःकारमयच .खरी सचोटी नि प्रामाणिकपणा हा चळवळींचा आत्मा असतो.आणि हे जर चळवळीतील कार्यकर्त्यांकडे नसेल तर चळवळ वांझोटीच. म्हणून आम्हाला आजच्या चळवळी काहीच देऊ शकल्या नाही हे माझे प्रामाणिक मत आहे.
प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
मु. :--पोई, पो. :-- वाहोली. ता. :--कल्याण जि.ठाणे.
9404608836