कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

रविवार, २७ नोव्हेंबर, २०१६

सपान मराठी कविता

" हिरवं सपान "

यावा पिकाले बहर ;
माळ फुळून निघावे.
माय मातीच्या उरात
हिर्वं सपान विसावे. ॥

लक्ष पाखरांचे थवे,
बांधा बांधाला झुरावे.
चिंबं पंखात भिजून,
हिर्वं सपान पडावे.॥

माय कूस बदलावी,
मातीतून यावे कोंब.
रानपक्षांनी करावी,
शेतामंदी झोंबाझोंब.॥

शेत सजावे धजावे,
सारे हिरवेगार व्हावे.
मृतीकेच्या कणातून
नव चैतन्य निघावे. ॥

खळं भरो काठोकाठ
लेक पिवळी होईल
घरीं मंडप सजले
दारी वारात येईल.॥

बा रे पावसा पावसा
तुला काही न वाटलं,
तू रे फिरवली पाठ;
हिर्वं सपान आटलं ॥

     ✒ प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
              पोई ; कल्याण ; ठाणे
              📞9930003930

गुलमोहर शब्दाचा

प्रिय वाचक मित्रहो माझ्या ब्लॉग चे नाव काल पासून बदलले आहे जुने चकाटपुशी हे नाव बदलून नवे नाव धारण करत आहे. आपण जो प्रतिसाद देता त्या मुळे लिखाणास प्रोत्साहन मिळते.असेच आपले प्रेम वाढत राहो.नाव बदलण्याचे कारण मी सर्वच प्रकारचे लेखन लिहीत असतो. कथा कविता लेख ललित लेख या मुळे सर्व समावेश असे नाव ब्लॉग घेतले आहे कृपया आपली मते कळवा आपला स्नेही प्रा श्री धनाजी जनार्दन बुटेरे पोई कल्याण ठाणे