💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
*पहिली प्रीत*
अंगी पळस फुलतो
रोमरोमी गडे भास
मनी पाऊस पडतो
दाटे मृत्तीकेचा वास ॥
नाही मन थार्यावर
चित्त सैरावैरा पळे
अंगाअंगात वादळ
काळीज आत जळे ॥
तुझे डोळ्यात सपान
वाटा डोळ्यात बुडती.
जागे पाणीच डोळ्यांना
स्वप्न उद्याची पडती ॥
मी आता माझा कुठे?
सारा तुझाच उरलो.
फक्त एक क्षणासाठी
किती किती गं झुरलो.॥
आता पाय कुठे खाली
मी उडतोय आभाळी
माझं पहिली वहिली प्रित
"तू " रेखिली कपाळी ॥
कुठे उरलो मी माझा
आता तुझी फक्त गाणी
माझ्या पहिल्या प्रेमाची
तू पहिलीच कहाणी ॥
*प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे*
पोई ; कल्याण ; ठाणे
*अध्यक्ष*
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे
(कल्याण ग्रामीण)
djbutere@blogspot.com
💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘