कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

औदसे...!

औदसा .....!








DRAFT





तिने कुंकू लावले.
म्हणून एकच गळका.
कानाकोपरा झाला बोलका.
" बाईचं लक्षण ठीक नाही ".
कुजबूजत होता.
बायांचाच घोळका.
झुकली शरमेने मान.
विसरली भूक तहान.
'कसं सांगू बाई, ?
'कुंकू लावले की
वखवखलेल्या नजरा
नाही पडत या देहावर ,.
नवरा गेला की
नाही होता येत बाईला
हिरवीगार.
पांढ-या कपाळाला सह
वाळवंटात सारखा देह
घेऊन फिरते ती.
असंख्य डंख सोसत
जगते ती.
सकाळी सकाळी झाले
दर्शन तिचे तर एकच गजब.
विस्फारतात डोळे .
पुटपूटतात ओठ.
"कुठून आली ही औदसा"
ती जगली असती
आमावस्ये सारखी.
घेतले असते तिने
स्वतःलाच स्वतः
कैद करून
पण दोन चिल्ली पिल्लूची
असतात तिच्या काखेला.
------------  @ - @  -----------

प्रा श्रीधनाजी जनार्दन बुटेरे
मु.पोई,पो.वाहोली,
ता.कल्याण,जि. ठाणे ,
फोन  :--  ₩   9404608836


Labels: सदर कविता काॅपीराईट आहे.