आजची स्त्री
परमेश्वराची सर्वात सुंदर कलाकृती म्हणजे स्री. याच स्त्री देहाचा प्रत्यक्ष मोह परमेश्वराला सुद्धा आवरता आला नाही. म्हणून श्रीविष्णूने तिलोत्तमा या अतिसुंदर स्त्री स्वरूप धारण केले. स्त्री म्हणजे मांगल्य, वात्सल्याची मूर्ती,त्यागाचे निस्सीम रूप, स्त्री म्हणजे करुणेचा सागर, स्त्री हणजे ममतेचा झरा,अशा असंख्य रूपात आपणास स्त्री भेटते. कालानुरूप तिच्या भूमिका थोड्या फार बदलत गेल्या. पण आई म्हणून तिची भूमिका आबादित आहे.अगदी अठरा-एकोणीसव्या शतकापर्यंत तिची भूमिका "चूल आणि मूल" एवढीच होती. पण एकविसाव्या शतकातील रुढी-परंपरा यांच्या बंधनातून मुक्त झाली. तरीसुद्धा काही सामाजिक बंधनात ती आहेच.
अठराव्या शतकाच्या अखेरीस स्री भयानक अशा यातना सहन करत होती. सामाजिक रूढी परंपरा यांची बळी स्त्री ठरली होती. त्यातील 'सतीप्रथा' पतीच्या मृत्यूनंतर तिला जिवंत चितेत प्रवेश करावे लागत असे.
आणि तिने असे केले नाही तर समाजातील कर्मठ मंडळी तिला त्या चितेत ढकलत असत.आणि स्त्रीच्या मरणाचा तमाशा समाज पाहत असे. तिच्याच प्रतिकार करण्याइतकी शक्ती नव्हती बिचारी गुमान सहन करत असे तो काळच असा होता.उंबरठा ओलांडायाची स्रीला मुभा नसे.म्हणजे ती घराबाहेर पण जावू शकत नव्हती. समाज सुधारक राजाराम मोहन राॅय यांनी कडाडून विरोध केला.लार्ड बेटींग यांनी सतीप्रथे विरुद्ध कायदा तयार केला.संकटातून मुक्तता होते न होते तोच केशोपण पद्धत सुरू झाली.धर्ममार्तंडांनी नवा डाव रचला पुन्हा बळी स्त्रीचा.एकीकडे बालविधवा हा प्रश्न गहन होता. लहानपणी लग्न झालेल्या मुलीचा नवरा दोघेही वयात येण्याअगोदर पतीचे निधन व्हायचे.आणि जन्मभर विधवा म्हणून जागायची.अशाने एखादी विधवा तारुण्यात यायची आणि वाकडे पाऊल पडायचे.आणि कुमारिका माता म्हणून हिण आयुष्य जगायची.समाजातून त्रास व्हायचा मग बिचारी स्वतःचा आणि त्या अर्भकाचा बळी द्यायची. नाही तर विधवा म्हणून आयुष्य कुंठीत बसायची.या प्रथेतून मुक्त व्हायला बराच काळ लोटला पण महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी या प्रथेतून महिलांना मुक्त करण्याची पहिले पाऊल उचलले आणि विधवा विवाहास सन्मानाने होऊ लागल्या त्यातूनच जेरठविवाह प्रथा सुरु झाली.म्हणजे बाल विधवेचा एखाद्या म्हाताऱ्या पुरुषाबरोबर लग्न लावून देणे.मुलगी कुठे तरी तोंड काळे करेल. या भीतीने आई-वडिलांकडून हे पाऊल उचलले जाई.
स्त्रीमुक्ती ची खरी पहाट उगवली ती 1853 मध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये भिडे वाड्यात सुरू करून स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून उदयास आल्या महिलांच्या डोक्यावरची पाटी जाऊन हातात अक्षराची पाटी आली या युगाच्या युगप्रवर्तक सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले हे दांपत्य होय.
मुली शिकू लागल्या अक्षरांशी बाईची दोस्ती झाली. आनंदीबाई जोशी सारखी महिला डॉक्टर झाली बाई बाहेरच्या जगात पडली परदेशात महिला मुक्त श्वास घेत आहेत. मात्र भारतात अजूनही स्त्री गुलाम आहे.याची जाणीव त्यांना झाली. यातूनच जागृती होऊन स्त्रीस्वातंत्र्याच्या चळवळींनी जोर धरला. शिक्षणाच्या प्रगतीचे स्रीला आकाश ठेंगणे वाटू लागले. नव्या युगाची सुरुवात झाली.म्हणता म्हणता एकविसावे शतक उजाडले शिक्षणाने स्त्री शहाणी झाली. तिला आत्मभान आले.स्व ची जाणीव झाली. ती उत्तुंग भरारी घेऊ लागली.नऊवारीतील स्त्रिया सहावारीतून पंजाबी आणि पंजाबातून कधी जीन्स मध्ये आली कळत नाही. आणि संकल्पना बदलून गेली स्त्री नोकरी करू लागली.ती ऑफिसमध्ये कामा करू लागली. आरक्षणाच्या बळावर तीन उच्च पदाची नोकरी पदरात पाडून घेतली.ती ऑफिसात बॉस म्हणून मिरवू लागली. सर्व क्षेत्रात तिने आपला ठसा उमटविला.असे कोणतेच क्षेत्र नाही जेथे तिने स्पर्श केला नाही स्वर्गीय इंदिरा गांधींच्या रुपाने ती पंतप्रधान पदावर विराजमान झाली. तर श्रीमती प्रतिभा पाटील यांच्या रूपाने ती राष्ट्रपती हे भारताचे सर्वोच्च पद भूषविले. ती सध्या मुक्त स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहे.
पण या मुक्त स्वातंत्र्याचा आजची स्त्री अतिवेक करत आहे.नऊवारीतील स्री जीन्स पर्यंत आली तर ठीक आहे. पण मुक्त स्वातंत्र्याच्या नावाने ते कमी कपड्यात वावरू लागली.जीन्स तीची गरज होती.पण शरीर प्रदर्शन करावे.म्हणजे मुक्त स्वातंत्र्याचा कडेलोटच ती स्वैराचाराने वागू लागली.तिला वाटायला लागला परदेशात तर स्त्रीया कमी कपडे घालतात.आपण घातले तर बिघडेल कुठे? असा प्रश्न तीला पडला .पण भारतीय संस्कृती आदर्श संस्कृती आहे म्हणून किमान आपल्या संस्कृतीचा मान राखायला हवा.सध्या पब पासून बियर बार पर्यंत तीचा मुक्त मनसोक्त वावर आहे. दारू बरोबर ती सिगरेटचा झुरका मारते. हेच का स्वातंत्र्य?
सध्या चित्रपट गृहात सहकुटुंब सिनेमा पाहता येईल असे चित्रपट फार विरळ उघड्या स्त्री देहाचे चित्रण दृश्यांचा भडीमार पहायला मिळतात.
आता हा चित्रपट दिग्दर्शक निर्माता पुरुष असतो.पण जीचे शरीर दाखवायचे आहे ती स्री आहे. याचे भाण आम्हाला हवे.स्रीदेहाचा बाजार मांडवा हे योग्य नव्हे.
अंगप्रदर्शन करावे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक खाजगी प्रश्न आहे.असे मला वाटले.तरी काही आंबट शौकिनांसाठी निर्माता किंवा दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून कुणी एक स्त्रीने अंगप्रर्दशन करावे हे मला तरी नपटण्या सारखे वाटते.
सध्या देशात बलात्काराच्या घटनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे.याची कारणे काहीही असतील मात्र दोष स्रीलाच दिला जातो. स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण झपाट्याने खाली येत आहे.भ्रूणहत्या होत आहेत. ही गोष्ट नवरा-बायको दोघांच्या मताने होते. पण एक स्त्री आपल्या पोटातील दुस-या स्रीची मारते.याला जबाबदार नवरा की बायको? तो जबरदस्ती करतोय अशा तक्रारी कुठेच येत नाही .भ्रूणहत्याा चोरीछुपे चालूच आहे.
त्याच बरोबर हुंडाबळीच्या घटना ही पुढेयेत आहेत. तक्रार सासू विरुद्ध असते म्हणजे एक स्त्री दुसऱ्या सी विषयी तक्रार करते. सासू-सुनेला छळते, मारते ,जाळते.नवरा,सासरा,ही नावै फार तुरळक असतात.दोष स्त्रियांना देत नाही पण शंकेची पाल चुकचुकते.एवढे मात्र खरे. एकत्र कुटुंब पद्धती संपली आहे. कारण मुलींना सेपरेट रहायचे असते.एकुलता एक मुलगा जर वेगळा रहायला लागला तर म्हातारे आईवडील कुठे जातील?
वृद्धाश्रमात.!
शेवटी या भारत वर्षामध्ये. स्त्रीला सन्मान दिला जातो तिला विविध रुपात समाज पूजतो. वेगवेगळ्या रुपात पूजा केली जाते आंबा,दुर्गा,महिषासुरमर्दिनी,काळी.. समस्त भारत वर्ष पूजत असतो कारण
॥ यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता ॥
॥ यत्रौतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्रा फळा ॥
याचा अर्थ असा ज्या ठिकाणी स्त्रियांना सन्मानाने वागवले जाते. तेथे प्रत्यक्ष देव संचार करीत असतो. आणि जेथे स्रिचा मान राखला जात नाही. तेथे केली जाणारी सर्व कार्य निष्फळ होतात. असा या श्लोकाचा अर्थ म्हणूनच आपला मान राखला जाईल असे वर्तन करावे तरच समाज तुमची पूजा करेल.
-------------------------------------------------------------
प्रा.श्री धनाजी जनार्दन बुटेरेे
मु.पोई.पोस्ट वाहोली .
तालुका कल्याण .जिल्हा ठाणे.
पिन कोड 421 301
मंगळवार, २८ एप्रिल, २०२०
आजची स्री
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)