कोरोनाच्या भीतीचे सावट
गेल्या महिनाभरापासून जगामध्ये कोरना या आजाराने थैमान घातले आहे. चीन पासून सुरू झालेला हा रोग आता जगाच्या कानाकोपर्यात पोहोचला आहे. चीन नंतर सर्वाधिक कोरोनाची झळ पोहोचणार देश म्हणजे इटली. जगातील विकसित राष्ट्रांत सह विकसित राष्ट्रांवर हे संकट आलेले आहे. कदाचित विकसित राष्ट्र या रोगाचा सामना धैर्याने करतील पण गरीब राष्ट्रांचे काय.? हा प्रश्नही अनुत्तरित राहतो.जगात जवळजवळ पावणे दोन लाख इतकी जनता कोरोना ग्रस्त झाली आहे.संपूर्ण जग कोरोनाच्या दहशतीखाली वावरत आहे. भारतातही सध्या कोरना आपले हातपाय पसरू लागला आहे. त्यातल्यात्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत.आजमितिला महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 65 इतकी झाली असून ;प्रमुख्याने पुणे, आणि मुंबई , या महानगरांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्यातरी या रोगावर ठराविक असं औषध उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेणे हाच या रोगावरील सर्वोत्तम उपाय आहे.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनानुसार.दि. २२मार्च दोन २०२० रोजी भारतीय नागरिक स्वयंस्फूर्तीने संचारबंदी पाळणार आहेत. परंतु लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की; ही संचारबंदी फक्त 22 तारखे पुरती मर्यादित आहे; की वाढवली जाईल. जर पुढे वाढवली गेली तर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होईल.आजच बाजारामध्ये सॅनीटायझर, हॅन्ड वॉश,मास्क यांचा बाजारात तुटवडा निर्माण झाला असून दुकानदार ग्राहकाकडून अव्वाच्यासव्वा रक्कम वसूल करत आहेत. हीच गोष्ट जर जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत घडली ;तर नागरिकांना अजून एका मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सरकारने वेळीच योग्य पावले उचलून. जीवनावश्यक वस्तूंचा साठे बाजार होणार नाही. याची दक्षता घेणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनीही ही स्वयंस्फूर्तीने संचारबंदी पाळून या राष्ट्राच्या आलेल्या संकटावर धैर्याने तोंड दिले पाहिजे. तरच आपण कोरोनासारख्या आजाराशी सामना करू शकतो.
जगातील इतर राष्ट्रांशी तुला केली तर; भारतात कोरोना आजाराचा फैलाव इतर देशांच्या तुलनेत फारच नगण्य आहे. कदाचित भारतीय हवामान कोरोना व्हायरस साठी योग्य नसेल; पण नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करता कामा नये; की रुग्णांची संख्या कमी न होता. दिवसेंदिवस ती थोड्या प्रमाणात का होईना वाढतच आहे. आपण याला वेळीच पायबंद जर घालू शकलो नाही; तर आपल्या राष्ट्रावर मोठी आपत्ती आल्यावाचून राहणार नाही.अगदी 1919 रोजी म्हणजे बरोबर शंभर वर्षांपूर्वी जगात अशाच एका आजाराने थैमान घातलं होतं त्यावेळी जगाची 5% इतकी लोकसंख्या कमी झाली होती भारतातही या रोगाने मोठा हादरा दिला होता जवळ जवळ दोन कोटी जनता याच्यात मृत्युमुखी पडली होती. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. पण आताची परिस्थिती जरी बदलली असली तरी रोग नवीनच आहे. त्यामुळे सध्यातरी आपल्याकडे यावर कोणताही ठोस उपाय नाही. तेव्हा आपण सर्वांनी आपली स्वतःची काळजी घेण्याबरोबरच दुसऱ्यांची काळजी घेऊ. गर्दीच्या ठिकाणी आपण जाणार नाही गेलो तरी ,मी माझी स्वतःची आणि लोकांचीही काळजी घेईन विशेषतः लहान मुलं आणि वयोवृद्ध माणसं यांना आपण गर्दीपासून लांब ठेवूया आणि कोरोना मुक्त भारत करू या!
शनिवार, २१ मार्च, २०२०
कोरोना आणि दहशत !!!
बुधवार, १८ मार्च, २०२०
कोरोनाला रोखावेच लागेल !!
जगभरात कोरोनाच्या महामारीने थैमान घातला आहे . सर्व जगात हाहाकार उडाला आहे. जगभरात माणसं भीतीने घराबाहेर पडायला घाबरत आहेत. प्रत्येकाच्या डोक्यावर मृत्यूचा सावट आहे. वैद्यकशास्त्रा पुढे कधी नव्हे इतका मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. हा रोग आवरायचा कसा म्हणून डॉक्टरही चिंतेत आहेत. आज आपण यावर वेळीच उपाययोजना केली नाही तर जगाचे भविष्य फार अंधकार असेल. चीन पासून सुरू झालेल्या या रोगाचा प्रसार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. भारतातील मुख्य शहरात हा रोग पसरला असून मुंबई,दिल्ली, कोलकत्ता,या महानगरांमध्ये हा रोग वाऱ्यासारखा पसरत आहे.
कोरणा हा रोग संसर्गजन्य असून त्याची लागण तात्काळ आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना होते. त्यामुळे या रोगाविषयी खबरदारी घेणे हाच या रोगावर जाळीम उपाय होय. चीन आणि भारत या दोन देशांचे समान सूत्र म्हणजे या दोन्ही देशांची अतिलोकसंख्या होय. रोगावर प्रतिबंध करण्यासाठी आपणास फारच खबरदारी घ्यावी लागते .दुसरी गोष्ट या देशांमध्ये या रोगाविषयी लोकांमध्ये आज्ञा आहे. लोकांमध्ये अज्ञान असून नक्की प्रसार कशामुळे होतो याविषयी लोक साशंक आहेत .त्यामुळे हा रोग प्रसार थांबवण्यासाठी खबरदारी बरोबरच लोकांमध्ये जनजागृती करणे. हे एक मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून या शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा होत असते त्यामुळे या शहरात जंतूसंसर्ग रोखण्यासाठी गर्दीवर कसा ताबा मिळवता येईल यावर लक्ष केंद्रित करणे आपले आद्य कर्तव्य ठरते. सरकारने याविषयी सखोल विचार करून मुंबई,दिल्ली, कोलकत्ता,चेन्नई,या महानगरांमध्ये संचारबंदी लागू करणे गरजेचे आहे. यामुळे देशाचा आर्थिक विकास घटला जाईल; पण "सर सलामत तो पगडी पचास" या अर्थाने आपल्याला नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी आर्थिक संकटाला ही सामोरे जावे लागेल.
खरं तर भारत सरकारने दोन आठवड्यापूर्वीच शटडाऊन करायला हवे होते. त्यामुळे या रोगाला भारतात हात-पाय पसरवण्यासाठी संधीच मिळालीच नसती; परंतु आपण याबाबतीत मागे पडलो. आणि इतर देशातील नागरिक या देशात आले. आणि बरोबर कोरणा सारखा महाभयंकर रोग घेऊन आले. हे आपल्याला रोखता आले असते पण केव्हा आपण पंधरा दिवसांपूर्वीच शटडाऊन करायला हवं होतं. आज इटलीमध्ये संपूर्ण देशात संचारबंदी लागू असून एकही नागरिक रस्त्यावर दिसत नाही. अशा प्रकारची खबरदारी जर भारत सरकारने रोग पसरण्यास अगोदरच घेतली असती,; तर आज जे दीडशे रूग्ण भारतात आढळले. तेसुद्धा आढळले नसते.जेव्हा देशाचं भविष्य पहायचं असतं तेव्हा काही गोष्टींच्या बाबतीत कठोर निर्णय घ्यावे लागतात. तसे कठोर निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. आज देशातील दीडशे रुग्णांपैकी एकट्या महाराष्ट्रात 44 रुग्ण आढळले आहेत आता तरी महाराष्ट्र सरकारने बस, रेल्वे,इत्यादी शंभर टक्के बंद करून या रोगाला हातपाय पसरण्यास संधी देऊ नये. अन्यथा वेळ निघून गेल्यावर किंवा परिस्थीती हाताबाहेर गेल्यानंतर आम्हाला काहीच करता येणार नाही. त्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी घोषित करून भविष्यात ओढणाऱ्या संकटाला आत्ताच दोन हात करता येतील. तेव्हा कृपया उद्धव साहेबांनी शुभस्य शीघ्रम करून या रोगाला महाराष्ट्रात हात पाय पसरण्याची संधी देऊ नये.