कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

रविवार, ६ नोव्हेंबर, २०१६

व्याभिचारी

एकटी दुकटी बाई बघून ;
लगट करू पहातो माणूस.॥

व्याभिचाराला प्रेम समजून ;
प्रेमात पुरता वाहतो माणूस. ॥

नसतता सा-या व्याभिचारी तरी ;
नालायक म्हणून पहातो माणूस ॥

ती दुस-याचे वैभव तरी ;
का तिला चाहतो माणूस ॥

ओरबाडून घेतो तिला तो तरी ;
दुसरीच्या मिठीत रहातो माणूस ॥

नखशिखांत ती तुझीच रे ;
तरी अंत पहातो माणूस ॥

प्रा.श्री. धनाजी जनार्दन बुटेरे
कल्याण ठाणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा