" हिरवं सपान "
यावा पिकाले बहर ;
माळ फुळून निघावे.
माय मातीच्या उरात
हिर्वं सपान विसावे. ॥
लक्ष पाखरांचे थवे,
बांधा बांधाला झुरावे.
चिंबं पंखात भिजून,
हिर्वं सपान पडावे.॥
माय कूस बदलावी,
मातीतून यावे कोंब.
रानपक्षांनी करावी,
शेतामंदी झोंबाझोंब.॥
शेत सजावे धजावे,
सारे हिरवेगार व्हावे.
मृतीकेच्या कणातून
नव चैतन्य निघावे. ॥
खळं भरो काठोकाठ
लेक पिवळी होईल
घरीं मंडप सजले
दारी वारात येईल.॥
बा रे पावसा पावसा
तुला काही न वाटलं,
तू रे फिरवली पाठ;
हिर्वं सपान आटलं ॥
✒ प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
पोई ; कल्याण ; ठाणे
📞9930003930
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा