🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
*वृध्दाश्रमातील आईचे मनोगत*
नको जाऊस सोडून,
सख्या नाते किती जुने
घर सरले ते मागे ,
पदपथ सारे सुने ॥
माझ्या जीवाच्या मैतरा
किती प्रवास काटला.
लागे चाहूल जाण्याची
माझा कंठच दाटला.॥
लेक दूर परदेशी
आम्ही येथे बंदिवान
घरदार तेथे ऊभे
आम्ही झालोया पाषाण ॥
काल ढासळला चिरा
माझ्या स्वैभाग्याचा चुडा.
हात गेलाय सोडून
माझ्या काळजात सुरा.॥
नाही शरीराची साथ
मन झालया हाळवं
वृध्दाश्रमात लेकरा.
होते कालवाकालव.
आता जगते एकटी
डोळा पैलतीरी लागे.
आता संपले ते नाते
आता संपले ते धागे. ॥
झाली आसवे मैतर
आठवणी झाल्या साथी.
आता बोलतात भिंती
सारी तकलादू नाती.॥
*प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे*
पोई ; कल्याण ; ठाणे
*अध्यक्ष*
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे
(कल्याण ग्रामीण)
djbutere@blogspot.com
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
उत्कृष्ट विषय साथ पोइट्री नेटवर्कमध्ये
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा