साठीतला विजनवास
भारतीय संस्कृती महान आहे. या संस्कृतीने "मातृपितृ देव भव"आईवडिलांना देवाचे स्थान दिले आहे. जगातील कोणत्याच संस्कृतीने एवढे मोठे स्थान आईवडिलांना दिले नाही. पण हीच संस्कृती आमची तरूण मंडळी विसरत चालली आहे. वृध्दाश्रम हे या तरुण पिढीने जन्मला घातलेले दैत्य. आपले सुख त्यागून जे सतत लेकरासाठी झटतात.लेकराच्या सुखात जे आपलं सुख मानतात ते आईबाबा.जो मुलगा पाहिजे म्हणून देवाला नवससायास करतात. कधी जन्म येणा-या मुलीची हत्या करून आपल्या डोक्यावर ब्राह्महत्येचे पातक घेतात ते आईबाबा. घरात वंशाला दिवा हवा म्हणून अनेक दिव्यातून जातात ते आईबाबा. म्हातारे झाले की आम्हाला अचानक नावडू लागतात. आणि आईबाबांची रवानगी होते वृध्दाश्रम नावाच्या तुरूंगात का?
असंख्य उत्तरे आहेत. मुलगा सून दोघेही नोकरीला असतात. किंवा मुलगा बाहेर देशात असतो.घर छोटंसं असते.सासूबाई सुनबाई कुणी तरी भांडकुदळ असतात. आईवडिलांची काळजी घेणारा कुणी नसतो.किंवा वंशाच्या दिवाच नसेल.कदाचित काही ठिकाणी ईभ्रतीचा प्रश्न असतो. म्हणजे घरात पाॅश पाहुणे येतात. त्यांच्या पुढे म्हातारे आईबाप कसेबसे वाटतात म्हणून वृध्दाश्रमात सोय होते.
पण वरील ब-याच प्रश्नांनांच्यामुळाशी पैसा नावाची आभिलाशा आहे. त्यामुळे आम्हाला आमचे जन्मदाते सुध्दा गौण वाटायला लागतात. पैशाची भूक फार भयंकर असते .माझ्या तरी पाहण्यात अशी व्यक्ती नाही ,ज्याची तृष्णा शमली आहे. अंबानी आडानी मल्या सारख्या नवकोटनारायनांची भूक शमली नाही जे आज जगातली दहा श्रीमंत पैकी एक आहेत. पैसा मानसाला आईवडिलांना सोडायला लावतो.आणि तो दूरवर मानसाला घेऊन जातो. आणि मातीची नाळ तोडून टाकतो.तो नाती ही तोडतो.नि सख्खा भाऊ वैरी होतो.
आम्हाला दोन दिवसांपूर्वीची घरात आलेली पत्नी आवडू लागते.तिने सांगितलेल्या गोष्टी आम्हाला ख-या वाटू लागतात. आईपेक्षा बायकोवर जास्त विश्वास बसतो.क्षणात आई कैकयी वाटू लागते.बायकोसाठी आमची जान हजीर असते.आईपासून मुलगा दूर जातो.कालपरवा आईच्या मागे फिरणारा बायकोच्या मागे घुटमळत फिरतो. काळजाचा तुकडा दूरदूर जाऊ लागतो.मग घरात संघर्ष सुरू होतो.बायको जिंकते .घरात खटके नको म्हणून आईबरोबर वडील पण वृध्दाश्रमात आपलं राहिले आयुष्य कुंठीत बसतात.आयुष्यभर काडीकाडी जम झाली की आपण कमविलेले सारे वैभव ती काळजावर दगड ठेऊन सोडून येते.कुणी तरी अमेरिकेत रहातो म्हणून आईवडिलांना येथे सोडतात.कुणी घरात अडचण नको म्हणून आईवडिलांना येथे सोडतात. वृध्दाश्रमात कुणीच खुशीत येत नसतो.पण नियतीने वाढलेले पूर्वसंचित म्हणून गुमान सहन करतात.
खरंतर आयुष्यभर आईबांनी पै पै जमवून घर ऊभे केलेले असते. राबराब राबतात.सकाळी सहा वाजता घरातून निघालेला बाप रात्री उशिरा यायचा. तो रात्री उशिरा घरात यायचा. झोपलेली लेकरं पाहून हिरमूसळा व्हायचा मुलांशी खेळायला विसरायचा. बोलायला विसरायचा. धड बायको बरोबर तो बोलत नसायचा."मुलं मोठी झाली की आपण असं करू, तसंकरू "" अशी स्वप्नं तो पाहायचा. खरं तर आईबाबा जगायचं राहून गेलेले असतात."मूलं मोठी झाली की..."हे त्याचे वाक्य अखडले जाते.आता त्यांना खूप बोलायचे असते पण कुणाशी बोलणार. या मुक्या भिंतीबरोबर की स्वतःबरोबर.पण स्वतःबरोबर बोललं की लोक त्याला वेडा म्हणतात. आयुष्यात सोसलेत ते सांगायचे असते त्यांना मुलाला सुनेला. शेजारीपाजारी बरंच सांगायचे असते. आता कुणाला सांगायचे. देवपूजा करायची असते;मनसोक्त जी नेमकी घाईघाईने केली जायची. नातेवाइकांच्या लग्नात मिरवायचे असते.पारावरती जाऊन गप्पा झाडायच्या असतात. कधी तरी मित्रांबरोबर चावट बोलायचे असते.आता ते सारे राहीले होते.
प्रत्येक आईवडिलांची एक तीव्र ईच्छा असते. नातुला मांडीवर घेऊन त्याला खेळवावे.त्याचे ईवले ईवले हात धरून गल्लीत फिरवावेत.त्याला रामायण महाभारतातील गोष्टी सांगाव्या.कधी तरी नातवाने धोतर छराब करावे आणि मुलगा आला की त्याला सांगवे "अरे आज ना बाळाने माझे धोतर खराब केले.'" ; तू पण असाच होते हो.' नातवाल आंघोळ घालावी त्याची दृष्ट काढावी असं सगळ्याच आजींना वाटतंय .पण आज ते आसतात माणसकीच्या कैदेत आपल्या मुलाने बापासाठी तयार केलेली. काही आईबाबांच्या वाट्याला आपल्याच घरात विजनवास आलेला असतो. कारण घरात छान छान पाहुणे येतात.मग त्यांच्या समोर म्हातारे आईबाप कसे बर वाटतात.?म्हणून म्हाता-या आईबाबांना घरातील एक खोली दिली जाते. ती खोली म्हणजे त्या लाचार जीवांचे विश्व. तेथेच खाणेपिणे,तेथेच गप्पा नि तेथेच सारे आयुष्य ही जीव जगतात.
खूप वर्षांपासून पै पै जमवून घर ऊभे केलेले असते.खिशाला मुरड घातलेली असते.तोंड शिकवलेले असते. स्वतःसाठी कारभारणी काही घेतले नसते.
आता थोडी उधळपट्टी करायची असते.कीर्तणाला जायचं राहीलेले असते.पत्यांचेडाव रंगवायचे असतात. पण कुणाशी बरोबर पत्ते खेळायचे. आईवडिलांनी. मग काय करणार हे म्हातारे जीव शून्य नजरेतून बाहेरचे जग न्याहाळत असतात.मृत्यूची वाट पहात.पण दोघांनाही भीती असते. आपल्या नंतर ही किंवा हा कसा जगले.तोंड असून बोलता येत नाही. दात असून खाता येत नाही. डोळे असून
पहाता येत नाही. जगणं फार भयाण असते.स्वतःच्या घरात ते पाहुणे असतात.डोळ्यांच्या खाचा करून करून फक्त ते मृत्यूची वाट पहात असतात. मृत्यू ही त्यांना छळत असतो.तो येतच नाही मग जगणं अजूनच कठीण होते. ते रोज वाट पहातात पण तो येत नाही.
एकीकडे शरीर साथ देत नाही तर दुसरीकडे आमच्याच हाडामासाचे गोळे आमच्या रक्ताने थेंब आम्हाला छळत असतात. अशा वेळी हे यमदेवता तू का बरं आम्हाला प्रसन्न होत नाही असे ते देवाला विनवत असतात.
खरं तर ही त्यांच्या आयुष्याची ती सुरेख संध्याकाळ असते.पण ती रोजच भयाण होत जाते.
नाती तकलादू होतात.प्रेम तकलादू होते. म्हातारे आईवडील म्हातारा पणात काय मागतात हो.दोन प्रेमाचे शब्द थोडी चिमूटभर सहानुभुती. थोडासा आदर नि आभाळभर माया.जी त्यांचा नातू देणार असतो.दुखले खूपले तर मुलाने आपुलकीने विचारावे " बाबा बरे नाही वाटत?" बस्स म्हातारे आईबाप पैशावर नाही प्रेमावर जगत असतात. शेवटी आपण काय तारुण्यात कायम राहणार नाही. आपल्या ही वाट्याला म्हातारपणी येणारचं.मग तौमची मुलंही तुमचा कित्ता गिरवणा नाही या भ्रमात राहू नका. कारण तो ही एक संस्काराचा भाग आहे. ते तुमच्या मुलांवर नकळत होणारच.ते थोड्या दिवसाचे पाहुणे आहेत. ते अचानक जातील एक दिवशी. ...
प्रा.श्री. धनाजी जनार्दन बुटेरे
पोई कल्याण ठाणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा