प्लास्टिक बंदी आणि रोजगाराची संधी
दि 23 जून पासून राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्या व थरमाकोलवर बंदी आणली आहे.आणि राज्यभरातून वेगवेगळ्या स्तरातून अनुकूल, प्रतिकूल आशा प्रतिक्रिया येत आहेत. पण व्यवसायिक व दुकानदार वगळता सर्वसामान्य माणूस प्लास्टिक बंदीचे स्वागत करताना दिसतो आहे.खरंतर आपणा सर्वांना स्वागत करण्यासारखी बाब आहे. सर्वच व्यापारी मंडळी आता आमचे कसे होणार ? म्हणून उर कुटताना दिसतात. पण पंधरा सोळा वर्षापूर्वी काय होते ? जरा आठवा ?.दूधवाला भांड्यात दूध घालायचा.आपण तेल आणायला घरून बाटली किंवा डबा नेत होतो.बाजारात जाताना पिशवी न चुकता नेत होतो.मग प्लास्टिक आले नि माणसाला आळशी बनविले.आता लगेच आपल्या ला गैरसोय होऊ लागली. पण आपण रहातो.पृथ्वीचे काय ? त्या परीसराचे काय ? हा प्रश्न कुणालाच पडू नये.
जरा नद्यांकडे पहा. सागर किनारे पहा.तुंबलेली गटारे पहा. आणि शहरापासून थोड्या लांब अंतरावर असलेले डंपिंग ग्राऊंड पहा.सारे बकालवाने.गावापासून शहरात पर्यंत किळस आणणारे चित्र केवळ आणि केवळ प्लास्टिकमुळे.पर्यावरणाच्या मुळावर उठलेले हे प्लास्टिक मुळासकट उपटायला हवे.यासाठी धोरनात्मक निर्णय घ्यायला हवेत. प्लास्टिकच्या कारखान्यांच्या मुळावर घाव घालायला हवेत.प्लास्टिक निर्माण करणारे कारखाने बंद व्हायला हवे आहेत. नाहीतर प्लास्टिकचा पण गुटखाबंदी व्हायला वेळ लागणार नाही. गुजरात मधून गुटख्या प्रमाणे प्लास्टिक येत राहील. गुटखाबंदी नंतर सरकारचे अबकारी कर बुडले. पण रेल्वे स्टेशन,बस स्थानकावर पिचका-यांनी रंगविलेल्या भिंतीची संख्या कमी झाली. स्वच्छ स्टेशन,बस थांबे दिसायला लागले.आता गुटखा येतो. तो गुजरात मधून. तसे शेजारच्या राज्यभरातून प्लास्टिक येईल म्हणून खबरदारी घ्यायला हवी. आणि प्रशासनाने धडक कारवाई करावी.धाक आणि जबर असल्या शिवाय भारतीय कोणतीच गोष्ट स्वीकारत नाही. हा इतिहास आहे.
दुसरी फार मोठी जमेची बाजू म्हणजे. प्लास्टिक आणि थरमकोल बंदीमुळे थरमकोलची ग्लास आणि लग्नात आणि मोठ्या कार्यक्रमात वापरली जाणारी ताटं बंद होणार आहेत. त्यामुळे पळसाच्या पानांच्या पत्रावलीला सुगीचे दिवस येणार आहेत. ही पळसाचीपाने जंगलात मिळतात. आणि ही जमा करणारे सर्वच कामगार खेड्यातील आहेत. म्हणजे खेड्यातील लघुउद्योगाला चालना मिळणार आहे. विशेषतः ही पानं जमा करणारे आदिवासी आहेत.तेव्हा. त्यांच्या हाताला काम मिळणार आहे. पत्रावळ्या करण्याचे उद्योगाला चालना मिळणार आहे. बचतगटांना काम मिळणार आहे. मातीचे ग्लास " कुल्हड " बनवणारे कुंभार यांना काम मिळणार आहे. थोडक्यात काय? तर ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होणार आहे. आणि सगळ्यांत महत्त्वाचे. पर्यावरणाचे रक्षण होणार आहे.
तिसरी गोष्ट प्लास्टिक पिशवीला पर्याय हा कागद किंवा कापडी पिशवी असणार आहे.त्यामुळे रद्दी वर्तमानपत्रांचा पुनर्वापर पिशव्यांसाठी होणार आहे.किंवा पिशव्यांसाठी जुन्या साड्या पुन्हा वापरात येण्याची संधी आहे. म्हणजे त्याही कापडाचा पुन्हा वापर होणार आहे. म्हणजे शिंपी उद्योगाला चालना अपेक्षित आहे.शिवाय कागदाचा लगदा तयार करण्यासाठी जी झाडे तोडली जातात.काही प्रमाणात त्यावर अंकूश लागणार आहे. म्हणजे पर्यायाने पर्यावरणाचे हीत साधले जाणार आहे.
आणि या सर्वांत महत्त्वाचा म्हणजे. या वापरात येणा-या वस्तू पर्यावरण पूरक आहे. म्हणजे "इको फ्रेंडली" आहेत.परंतु अडचण आहे. ती जनतेच्या पाठींब्याची आणि सरकारी यंत्रणेची दोघांनी जर योग्य ती पावले उचलली तर.सुंदर शहरे,स्वच्छ गांव,समृद्ध नदी आणि हवेहवेसे समुद्र किनारे पहायला मिळणार आहेत.तेव्हा लोकहो आपण स्वागत करू या प्लास्टिकच्या बंदीचे.
प्रा.श्री धनाजी जनार्दन बुटेरे
मु.पोई,कल्याण ठाणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा