कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

ललित बंध (बायको आणि आई )

                     बायको आणि आई

                       प्रेम हा अडीच अक्षरी शब्द. या शब्दाभोवती मानवी जीवन फिरते आहे. आणि हे प्रेम आपली ओंजळ भरून देणारी सगळ्यांची आई.पण या आईच्या वाट्याला मात्र प्रेमाचा दुष्काळ.आई जीव ओवाळून टाकते.कदाचित जीव ही देते.पण बरीच मुले.कृतघ्न निघतात.खरे तर आईचे ऋण नविसरता येण्या इतपत.पण तरी कालपरवा आपल्या जीवनात आलेली एक सहचारी आपले सर्वस्व बनते. असे काय आहे पत्नीकडे.? आणि काय नाही आईकडे?. मला मात्र प्रत्येकाची आईग्रेट वाटते.
          साधारण नव्वद चे दशक होते. माझे काॅलेज सकाळी सातचे.त्यासाठी पहिली बस सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी.मी घर सोडत होतो.पाच चाळीस ला कारण बसथांबा  अगदी जवळ होता.पण एवढ्या सकाळी. माझी आई मला गरमगरम भाकरी आणि भाजीची न्याहारी द्यायची. ती पण सकाळी साडे पाच वाजता.गरम गरम चहा.अगदी आंघोळ केली की हातात पडायचा.बाथरूम मधे चड्डी टाॅवेल तयार असायचे.ते पण सकाळी पाच वीसला.कधी कंटाळा नाही की आदळाआपट नाही की कधी त्रागा नाही. की मी फार खस्ता खाते म्हणून टोमणा नाही. की कधी घाई झाली म्हणून उपाशी जावं लागलं असे नाही. रोज डबा. आणि ढेकर देत बाहेर पडायचो.पण मी हा समाधानाचा ढेकर द्यावा म्हणून माझी माय सकाळी भलभल्या पहाटे थंडी पावसात झोपमोड करून उठायची. कधी झोप मोडली म्हणून धुसफुसत नव्हती की उपकारांची भाषा नव्हती.बरं तिला काय एवढंच काम नव्हते. ती आमच्या आख्या संसाराचा गाडा एकटीच ओढायची.दिवसभर शेतात राबायची.काबाडकष्ट करायची.आणि झोपायला. रात्रीचे बारा नित्याचेच.तरी पहाट होऊन आई उगवायची. यात माझ्या पूर्ण काॅलेजच्या पाचसहा वर्षात खंड पडला नाही. हे माझीच आई करते असे नाही जगातल्या सर्वच आया करतात.पण मग मुले त्या बदल्यात आईला काय देतात.?
            त्यानंतर बरीच वर्षे गेली. मला नोकरी लागली.लग्न झाले मुलं झाली. आता मी सकाळी घर सोडतो पण पूर्वीसारखा सकाळी  सहालाच नाही .मी घर सोडतो सकाळी नऊला पण तरीही हातात डबा मोठ्या घाईगडबडीने पडतो .कधी डब्यासाठी ताटकळत बसावे पण लागते.सकाळची न्याहरी जवळ जवळ लोप पावत चालली आहे.कारण.आमच्या सौं ना खूप कामे असतात.रात्री उशिरा झोपते.आणि मग सकाळी उशीर होतो.मुले सकाळी साडे सातला घर सोडतात पण रोजच गाडीवाला वाट पहात बसतो.     शनिवारी सकाळी शाळा असते तेव्हा सारे आटपून मी घरात बाहेर पडे पर्यंत आमच्या सौ.ना पत्ता नसतो.कारण शनिवारी मुलांची शाळा नसते.मग         काबाडकष्ट करून भल्या पहाटे चार ला नचुकता उठणारी आई रोज आठवते.कारण सकाळी चारला ऊठून. आंघोळ करून. देवघरात लख्ख दिव्यानें घर उजळून टाकणारी आई.आणि रोजच देवघरातला दिवा उजळवण्याचे भाग्य माझ्या ओंजळीत टाकणारी पत्नी. किती जमिनआसमानचा फरक सांगते.तरी ही बरीच मुले हे विसरतात. आणि बदल्यात आईला मिळते काय? हेलसांड,अवहेलना, तिरस्कार, आणि उतार वयात पुन्हा काबाडकष्ट.
          आईला जगायला प्रेम लागते.सहानुभुती लागते.मायेचा ओलावा लागतो.आणि सगळ्यात महत्वाचे मायेची उब लागते.जी तिच्या वाट्याला फार कमी येते.वरील उदाहरण प्रत्येकाच्या आयुष्यात थोडे बहुत सारखे असते.पण काही बायका याला आपवादही असतील.तेव्हा. त्या प्रेमाच्या हकदार आहेत. पण आईच्या मायेची सर बायकोला कशी येणार. ?

प्रा.श्री. धनाजी जनार्दन बुटेरे
कल्याण ठाणे
फोन 9930003930

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा