कोरोनाच्या भीतीचे सावट
गेल्या महिनाभरापासून जगामध्ये कोरना या आजाराने थैमान घातले आहे. चीन पासून सुरू झालेला हा रोग आता जगाच्या कानाकोपर्यात पोहोचला आहे. चीन नंतर सर्वाधिक कोरोनाची झळ पोहोचणार देश म्हणजे इटली. जगातील विकसित राष्ट्रांत सह विकसित राष्ट्रांवर हे संकट आलेले आहे. कदाचित विकसित राष्ट्र या रोगाचा सामना धैर्याने करतील पण गरीब राष्ट्रांचे काय.? हा प्रश्नही अनुत्तरित राहतो.जगात जवळजवळ पावणे दोन लाख इतकी जनता कोरोना ग्रस्त झाली आहे.संपूर्ण जग कोरोनाच्या दहशतीखाली वावरत आहे. भारतातही सध्या कोरना आपले हातपाय पसरू लागला आहे. त्यातल्यात्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत.आजमितिला महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 65 इतकी झाली असून ;प्रमुख्याने पुणे, आणि मुंबई , या महानगरांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्यातरी या रोगावर ठराविक असं औषध उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेणे हाच या रोगावरील सर्वोत्तम उपाय आहे.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनानुसार.दि. २२मार्च दोन २०२० रोजी भारतीय नागरिक स्वयंस्फूर्तीने संचारबंदी पाळणार आहेत. परंतु लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की; ही संचारबंदी फक्त 22 तारखे पुरती मर्यादित आहे; की वाढवली जाईल. जर पुढे वाढवली गेली तर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होईल.आजच बाजारामध्ये सॅनीटायझर, हॅन्ड वॉश,मास्क यांचा बाजारात तुटवडा निर्माण झाला असून दुकानदार ग्राहकाकडून अव्वाच्यासव्वा रक्कम वसूल करत आहेत. हीच गोष्ट जर जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत घडली ;तर नागरिकांना अजून एका मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सरकारने वेळीच योग्य पावले उचलून. जीवनावश्यक वस्तूंचा साठे बाजार होणार नाही. याची दक्षता घेणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनीही ही स्वयंस्फूर्तीने संचारबंदी पाळून या राष्ट्राच्या आलेल्या संकटावर धैर्याने तोंड दिले पाहिजे. तरच आपण कोरोनासारख्या आजाराशी सामना करू शकतो.
जगातील इतर राष्ट्रांशी तुला केली तर; भारतात कोरोना आजाराचा फैलाव इतर देशांच्या तुलनेत फारच नगण्य आहे. कदाचित भारतीय हवामान कोरोना व्हायरस साठी योग्य नसेल; पण नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करता कामा नये; की रुग्णांची संख्या कमी न होता. दिवसेंदिवस ती थोड्या प्रमाणात का होईना वाढतच आहे. आपण याला वेळीच पायबंद जर घालू शकलो नाही; तर आपल्या राष्ट्रावर मोठी आपत्ती आल्यावाचून राहणार नाही.अगदी 1919 रोजी म्हणजे बरोबर शंभर वर्षांपूर्वी जगात अशाच एका आजाराने थैमान घातलं होतं त्यावेळी जगाची 5% इतकी लोकसंख्या कमी झाली होती भारतातही या रोगाने मोठा हादरा दिला होता जवळ जवळ दोन कोटी जनता याच्यात मृत्युमुखी पडली होती. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. पण आताची परिस्थिती जरी बदलली असली तरी रोग नवीनच आहे. त्यामुळे सध्यातरी आपल्याकडे यावर कोणताही ठोस उपाय नाही. तेव्हा आपण सर्वांनी आपली स्वतःची काळजी घेण्याबरोबरच दुसऱ्यांची काळजी घेऊ. गर्दीच्या ठिकाणी आपण जाणार नाही गेलो तरी ,मी माझी स्वतःची आणि लोकांचीही काळजी घेईन विशेषतः लहान मुलं आणि वयोवृद्ध माणसं यांना आपण गर्दीपासून लांब ठेवूया आणि कोरोना मुक्त भारत करू या!
शनिवार, २१ मार्च, २०२०
कोरोना आणि दहशत !!!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा