माझ्या रांडानो ही पुरस्कार प्राप्त कविता पोस्ट करतो आहे.
शनिवार, १९ नोव्हेंबर, २०१६
गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०१६
बाळासाहेब (कविता )
हिंदूह्रद्यसम्राट मानणीय
बाळासाहेब तुमच्या.
स्मृतीला ही
श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
या मराठी मानसाची भावपूर्ण काव्यंजली "
बाळासाहेब "
तू भगव्याचा शिपाई
शिवबाचा भक्त
आख्या हिंदूस्थानात
फक्त तुझंच भगवं रक्त
तू मुंबईत बोलायचा
पाकिस्तानात
पाकड्यांची टरकायची .
तुझ्या भाषणाने आवघी
मराठी डोकी भडकायची.
तुझ्या एका हाताने मुंबई थांबायची.
तू रस्त्यावर आला की ;
जुलूस निघायचे.
तू बंद ची हाक दिली की
आख्खी मुंबई निस्तब्ध व्हायची.
तू बोलायला लागलास
की लाखोंचा जनसागर.
कानात प्राण आणून
तुला ऐकायचा.
खरंच तू वाघ होता.
तुझ्या जाण्याने
मुंबई पोरकी झाली.
मराठी मुलुख पोरका.
चिडीचूप असतात मुंबईचे रस्ते.
चिडीचूप असते साहेब
तुमचे लाडके
शिवाजी पार्क.
✒ श्री. धनाजी जनार्दन बुटेरे
पोई कल्याण ठाणे
मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०१६
ललित लेख आनंदाचे झाड
रविवार, १३ नोव्हेंबर, २०१६
क्षण कविता
क्षण असे
क्षण येती आठव बनून
डोळ्यात साठते पाणी.
क्षण गतकाळाच्या;
आठवणींचे गाणी.॥
क्षण स्वप्ने घेऊन ;
येती असे हळूवार .
मी आठवणींच्या ;
पक्षांवरती स्वार. ॥
क्षण बांधून जाती
आठवणींचे घर.
क्षण बालपणींच्या;
आठवांचा बहर. ॥
क्षण डोळ्यामधे
कचकणआणती पाणी .
क्षण प्राजक्ताची
घेऊन येती कहाणी. ॥
क्षण धावत येती
मी बहरुन जातो असा.
मी होऊन जातो .
काळींदिचा डोह ती मासा.॥
प्रा. श्री. धनाजी जनार्दन बुटेरे
पोई ,कल्याण, ठाणे
📞9930003930
सोमवार, ७ नोव्हेंबर, २०१६
काही फोटो
साहित्य विषयावर नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पदांचे उमेदवार श्री जयप्रकाश घुमटकर व कवी भगवान निळे सोबत.