शुक्रवार, २० जानेवारी, २०१७
मराठी कविता (नभाच्या पल्याड )
💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💜💜💜💜💜💜💜💜💜💜💜
*नभाच्या पल्याड*
नभ दाटले आभाळी
मनी हूरहूर दाटे.
दूर नभाच्या पल्याड
मज प्रियकर भेटे.॥
येते पावसाची सर
मन फुलून निघते.
तेथे प्रियकर उभा
त्यास आयुष्य मागते ॥
येतो पाऊस गारवा
मन गंधाळून जाते.
शपथ प्रियकरा.
रोज याद तुझी येते॥
मन सैरभैर होते
स्तब्ध थांबातात मेघ.
कसा आवरू दिलवरा
माझ्या मनीचा आवेग. ॥
रिमझिम पावसाची
माझा दिलवर येतो.
सार्यां सुखांची आरास
माझ्या ओंजळीत देतो ॥
*प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे*
पोई कल्याण ठाणे
*अध्यक्ष*
महाराष्ट्र साहित्य षरिषद पुणे
(कल्याण ग्रामीण)
djbutere@blogspot.com
💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💜💜💜💜💜💜💜💜💜💜💜
सोमवार, १६ जानेवारी, २०१७
बिघडलेली तरुणाई
*बिघडली तरुणाई*
अरे गड्योंनो नवतरूणांनो
कशी चढली झिंग तुम्हा.
रम रमी नित्य लागते
अनिक जवळी तुम्हा रमा.॥
दिधला फेकून आदर आणिक
मोठ्यांचा सन्मान कुठे?
उंच उडायला आभाळ मग
तुम्हांस पडती नभ थिटे.॥
मंदिर सारी ओसची पडली
बार संस्कृती नित्य रुजे.
माय बाप ते वृध्दाश्रमी
श्रावणमाझा कुठे भजे॥
फुकाट खाता मुकाट फिरता
कष्ट तुम्हाला कुठे ठावे?
भरल्या पात्रावरून उठता
अन्नाला ठेवून नावे.॥
फॅशन म्हणजे स्वैराचार हा
पहाणार्याची मान झुके.
तरुणाई ही पार बिघडली
काय बोलावे शब्द मुके.॥
*प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे*
पोई ; कल्याण ; ठाणे
*अध्यक्ष*
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे
(कल्याण ग्रामीण)
djbutere@blogspot.com
हुंकार (मराठी कविता )
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
माझी बहिण काव्य स्पर्धेतद्वितीय क्रमांक
*हुंकार*
हुंकार भावनांचा
आता कुठेच नाही.
हारवली ज्याने त्याने
मायेचीच माई.॥
नातीचं झाली थिटी
एकटाच बाळ आहे
ती खुडली कळी
कोरेचं भाळ आहे. ॥
अग्रह पित्तरांचा
वंशाचा दीप व्हावा.
ताईच संपलेली
ओसाड सुन्न गावा.॥
कुठे एकटा भाऊ
कुठे एकटीच ताई
बहरा वाचूनिया
ही सुनीच वनराई.॥
आक्रोश आज आहे
हवी मला गे ताई
ताई वाचुनिया मम
जीवनास अर्थ नाही. ॥
*प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे*
पोई ; कल्याण ; ठाणे
*अध्यक्ष*
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे
(कल्याण ग्रामीण)
djbutere@blogspot.com
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
रविवार, १५ जानेवारी, २०१७
कविता (पहाड)
पहाड
आई सह्याद्रीचा कडा ;बाप हिमालय माझा.
वादळांना रोखतोया ;नाही लेकरेंना ईजा.
झाली जर्जर वहाणं ;बाप तिलाच जपतो.
सूर्य येतो डोईवर; बाप उन्हात तापतो.
टाके सद-याला त्याच्या; तरी नाही घेतं नवा.
माझा "बा" लय मोठा; जळे लामणदिवा.
पोरं उपवर झाली ; नाही डोळ्यात नीज .
फरफट पोरीसाठी ; त्याच्या पायामधी वीज
पैका पैका जमवितो ; नाही घडीचा विसावा.
माझ्या कवितेचा हिरो ; "बा" सुखात दिसावा ;
बाप पहाडा सारखा; आभाळही पुढे थिटे
माह्या चामड्याची चप्पल; ऋण तरी नाही फिटे.
श्री. धनाजी जनार्दन बुटेरे
पोई कल्याण ठाणे
9930003930
2) " उपहासाचा धनी "
जेवला का नाय ,
ईचारित नाय कोण ?
साधा मायेचा,
कोण करतंय फोन.
लय आबाळ जीवाची,
नुसती लाही लाही.
कोण पुसतंय
कुत्रा ढुंकून पाही.
तवा राबलास खपलास
उपाशी झोपलास.
वतवत केली, वनवन केली.
वनवन करता जिंदगानी गेली.
आज थकलास
कमरेत वाकलास.
अन् पोरांनी आणून;
वृध्दाश्रमात टाकला.
तवापण तूच शिक्षा भोगली.
गरिबी आली म्हणून.
आज तूच आपराधी.
पोरं श्रीमंत झाली
पैक्यावाली झाली म्हणून.
श्री धनाजी जनार्दन बुटेरे
पोई कल्याण ठाणे
9930003930.
मंगळवार, १० जानेवारी, २०१७
पहिली प्रीत (कविता )
💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
*पहिली प्रीत*
अंगी पळस फुलतो
रोमरोमी गडे भास
मनी पाऊस पडतो
दाटे मृत्तीकेचा वास ॥
नाही मन थार्यावर
चित्त सैरावैरा पळे
अंगाअंगात वादळ
काळीज आत जळे ॥
तुझे डोळ्यात सपान
वाटा डोळ्यात बुडती.
जागे पाणीच डोळ्यांना
स्वप्न उद्याची पडती ॥
मी आता माझा कुठे?
सारा तुझाच उरलो.
फक्त एक क्षणासाठी
किती किती गं झुरलो.॥
आता पाय कुठे खाली
मी उडतोय आभाळी
माझं पहिली वहिली प्रित
"तू " रेखिली कपाळी ॥
कुठे उरलो मी माझा
आता तुझी फक्त गाणी
माझ्या पहिल्या प्रेमाची
तू पहिलीच कहाणी ॥
*प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे*
पोई ; कल्याण ; ठाणे
*अध्यक्ष*
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे
(कल्याण ग्रामीण)
djbutere@blogspot.com
💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘
आईचे मनोगत (कविता )
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
*वृध्दाश्रमातील आईचे मनोगत*
नको जाऊस सोडून,
सख्या नाते किती जुने
घर सरले ते मागे ,
पदपथ सारे सुने ॥
माझ्या जीवाच्या मैतरा
किती प्रवास काटला.
लागे चाहूल जाण्याची
माझा कंठच दाटला.॥
लेक दूर परदेशी
आम्ही येथे बंदिवान
घरदार तेथे ऊभे
आम्ही झालोया पाषाण ॥
काल ढासळला चिरा
माझ्या स्वैभाग्याचा चुडा.
हात गेलाय सोडून
माझ्या काळजात सुरा.॥
नाही शरीराची साथ
मन झालया हाळवं
वृध्दाश्रमात लेकरा.
होते कालवाकालव.
आता जगते एकटी
डोळा पैलतीरी लागे.
आता संपले ते नाते
आता संपले ते धागे. ॥
झाली आसवे मैतर
आठवणी झाल्या साथी.
आता बोलतात भिंती
सारी तकलादू नाती.॥
*प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे*
पोई ; कल्याण ; ठाणे
*अध्यक्ष*
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे
(कल्याण ग्रामीण)
djbutere@blogspot.com
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
उत्कृष्ट विषय साथ पोइट्री नेटवर्कमध्ये