💜💜💜💜💜💜💜💜💜💜💜💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💛💛💛💛💛💛💛💛💛💛
*रंगहीन सारे*
दुष्काळाचा झंझावाता
घोंघावत आला.
गर्द काळा रंग माझ्या
आयुष्यचा झाला.॥
हिरवाई रुसून गेली
हिरवा चुडा फुटला.
आयुष्यातून हिरवा रंग
कुणी बरं लुटला.॥
पाऊस फितूर झाला.
तो नाहक बळी गेला.
कफनाचा पांढरा रंग
आयुष्यास माझ्या आला. ॥
जळते मी एकटी
भोवती लाल निखारे.
चटक्यांची वेदना
केवळ दुःख सारे.॥
काल झाली पिवळी
पांढरे उखळ सारे.
रंगहिन आयुष्य
अश्रू निथळणारे.॥
*प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे*
पोई ; कल्याण ; ठाणे
*अध्यक्ष*
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे
(कल्याण ग्रामीण)
djbutere@blogspot.com
18/12 /16
Copyright
💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💜💜💜💜💜💜💜💜💜💜💜
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा