कवी धनाजी बुटेरे गुणीजन पुरस्काराचे सन्मानित
शहापूर दि.23/ नुकताच शहापूर येथे भव्य कुणबी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कुणबी समाजातील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्या कुणबीबांधवांचा विविध क्षेत्रातील पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.यामध्ये कवी व प्राध्यापक श्री धनाजी जनार्दन बुटेरे यांना.कुणबी गुणीजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कवी धनाजी बुटेरे हे उत्तम कवी असून त्यांना महाराष्ट्रातील साहित्य लेखनासाठी चे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.त्याचा "पळसबहर "हा कविता संग्रह प्रकाशित आहे.विविध वृत्तपत्रात दिवाळी अंकात त्याचे साहित्य प्रकाशित झालेले आहे. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून त्याचे कविता वाचनाचे कार्यक्रम झाले आहेत. तसेच मुंबई दूरदर्शन केंद्रावर सुध्दा काही कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. 17 डिसेंबर रोजी एकता कल्चर संस्थेच्या वतीने त्याना पुरस्कार देण्यात आला त्या पाठोपाठ रोजी शिक्षकांच्या काव्यवाचनाचे स्पर्धेत त्यांना. प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाला आहे. ते कथा कविता ललित लेख .या विषयावर लिखाण करतात. आता पर्यंत त्यांनी एक हजारापेक्षा जास्त दर्जेदार कवितांचे लेखन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा