"खरच गुरुजी फुकट पगार घेत होते का ?"
लहानपणापसून आपला आपल्या शिक्षकांबरोबर फार वेळा सबंध येतो.ब-याच मुलांची शिक्षक होईन असे स्वप्न असते.याचे कारण आपले आयडॉल आपले शिक्षकच असतात.आपले ध्येय तेच असते.अलीकडे मुले,डाॅक्टर, इंजिनिअर, पायलट, आय.टी.क्षेत्रात जाऊन करिअर करण्याचे स्वप्न पहात असतात.कुणी तरी आय.एस.अधिकारी होण्याचे स्वप्न पहात असतो.याचे कारण मोठे झाल्यावर आपले येणारी जगाशी सबंध.त्यामुळे आपण जसे मोठे होतो.तसे आपली स्वप्न बदलतात.
थोडक्यात काय आपल्या विचारांचा आवाका जितका मोठा.तितकीच आपली स्वप्न पण मोठमोठी भरारी घेतात.आपण कोणत्या समाजात वाढतो.?आपले मित्र कोण ?या वरही आपली स्वप्न ठरत असतात.पण आपण ज्या व्यक्तींच्या सहवासत अधिक काळ घालवतो.तेथेही आपली स्वप्न आकार घेत असतात.आपली सामाजिक, आर्थिक परिस्थितीवर सुध्दा आपली स्वप्न ठरत असतात.कारण स्वप्नांना आकांक्षांचे पंख हवेत.आणि परिस्थितीचे आकाश हवे.तरच स्वप्न सत्यात उतरतात.अन्याथा स्वप्न स्वप्नच बनून रहातात.स्वप्न पूर्णत्वास जाण्यासाठी एकतर तुम्ही जातीवंत हुशार हवेत,नाहीतर पैशाची जोड तरी हवी.!असे असेल तर स्वप्न लवकर आकाशात भरा-या घेतात.भारताचे माजी महामहीम डाॅक्टर अब्दुल कलाम म्हणतात."स्वप्नही जागेपणी पहायची असतात.तीच खरी स्वप्न.!"आपण दिवसा पहातो ती स्वप्न खरी सत्यात येत असतात.रात्री पहातो ती स्वप्न नव्हेच.त्यामुळे ते विद्यार्थ्यांना स्वप्न पहाण्याचा सल्ला देतात.
वरील माझा विवेचनाचा उद्देश मुलांच्या भावविश्वात शिक्षक नेहमीच घर करून असतात.शिक्षकाला असणारी सामाजिक प्रतिष्ठा.आता इतिहास जमा झाली आहे.तेव्हा तरी होतीच.आलीकडे मात्र सगळ्यांना फुकट आणि खूप पगार घेणारा प्राणी म्हणून शिक्षकाकडे पाहिले जाते.शिक्षक हा फुकट पगार घेतो.त्याला खूप सुट्या असतात.तो काहीच काम करत नाही.आता समाजात असे काम न करता पगार घेणारे शिक्षक असतीलही; पण फार थोडे चिमूटभर असतील.पण सगळेच तसे नाहीत.खरे पाहिले तर सरकारी शाळेतून बाहेर पडलेलेच सर्वात जास्त प्रशासकीय सेवेत आहेत.मग हे कसे शक्य आहे.त्याचा मूळ पाया याच सरकारी शाळेतील शिक्षकांनीच पक्का केलेला असतो. मग काम करत नाहीत हा लेबल आपण कसा काय लावून मोकळे होतो.?आता सरकारी सर्वच कर्मचारी तेवढ्याच सुट्टय़ा घेतात.जेवढे शिक्षक घेतात.किंबहुना कार्यालयात काम करणा-या कर्मचाऱ्यांला सर्वात जास्त सुट्टयाउपभोगता यातात.सरकारी कार्यालयात काम करणारे सर्व कर्मचारी(यात शिक्षक नाही) कारण शनिवारी शिक्षक काम करतात.शिक्षक दर शनिवारी शाळेत असतात.मग सुट्टय़ा कोण जास्त उपभोग असतो.?
उलट दहावी बारावीचे गणित,विज्ञान यांचे जादा तास घ्यावे,लागतात.स्कॉलरशिप सारख्या परीक्षांचे अभ्यासक्रम पूर्ण करणे,हे कामाव्यतिरिक्त जादा काम शिक्षक करत असतो.हे कुणाला कसे दिसत नाहीत.?
तरी शिक्षकांना का दोष दिला जातो.?कारण आपल्याला दिसतो तो शिक्षक हा एकमेव घटक आहे.जो भ्रष्टाचार न करता काम करतो.दुसरी गोष्ट शहरातून तो ग्रामीण भागात येऊन काम करतो.बाकी सगळ्याच घटकांना शहर खुणावत असते.एकदम दुर्बल घटकाचा आणि त्याचा सहसबंध येत असतो.गरिब पालक आणि गरीब विद्यार्थ्यांना प्रेमाने शिक्षणाची शिदोरी देणारा फक्त शिक्षक असतो.आता आपण शहरातून गावात येणारे अजून कर्मचारी पाहू,ग्रामसेवक,तलाठी,आरोग्य कर्मचारी,आता ग्रामसेवक किती दिवस आणि किती वेळ कार्यालयात असतो विचार करा.तलाठी किती फेरीत आपल्याला भेटतात अनुभवा.बरे ब-याच वेळेस काम करण्यासाठी पैसे लागतात.शिक्षक तुमच्या मुलांकडून किती फी घेतो.सांगा.?कोणती शाळा आठवडाभर बंद असते सांगा?.मग तरी तुमच्या रडारवर गुरुजी का?कारण त्याचा पगार सगळ्यांना माहीत असतो.ग्रामसेवक, तलाठी पगारी नोकर असूनही तुमच्याकडून कामाचे पैसे घेतात.तरी त्याला आपण कधीच पगार विचारत नाही.कारण गुरुजी हाच मुली चेष्टेचा विषय झालाय आलीकडे.
लाॅकडाऊन मुले तर गुरुजी हीट लिस्ट वर आले.कारण सरकारी शाळेतील गुरुजी शिकवत नाहीत.आता सारेच सरकारी कर्मचारी कमी अधिक काम करत होते.कुणी घरी,तर कुणी कार्यालयात.पण पुन्हा सगळ्यांना दिसले ते गुरुजी.याचे सगळ्यात महत्वाचे कारण सरकारी शाळेत विद्यार्थ्यी येतात ते दुर्बल घटकातील.आता सगळ्यांकडे महागडे मोबाईल असतात असे नव्हे.पण खाजगी शाळेतील शिक्षक मात्र शिकवताना दिसले.आता पुन्हा गुरुजीवर आरोप कमी पगाराची माणसं शिकवतात मात्र जास्त पगार घेणारा सरकारी शाळेतील गुरुजी शिकवत नाही.आता खाजगी शाळेतील पालक धनदांडगे असतात घरी दोन तीन महागडे मोबाईल असतात.तेव्हा ऑनलाईन शिक्षणाची प्रक्रीया सुरळीत पार पडते.गरिब पालकांकडे इंटरनेटचे रिचार्ज मारायला पैसे नसतात.तेव्हा महागडे मोबाईल कुठूनआणणार?.असले तरी एक दोन कमी अधिक पालकांकडे.त्या प्रमाणात शिक्षक त्यांना मार्गदर्शन करतात.ब-याच सरकारी शाळेतील शिक्षकांनी धोका पत्करून कुणाच्या तरी घरी,कधीच चोरून शाळेत वर्ग घेतल्याचे मी पाहिले आहे.तेव्हा सरसकट शिक्षकाला आरोपीच्या पिंज-यात आपण त्याला उभे करून मोकळे होतो.
शिक्षकांना असणाऱ्या सुट्टया हा सर्वांना चुंगम सारखा चघलत बसायला लावणारा विषय.खरे तर सुटण्याची नियमावली शासन ठरवत असते.शिक्षकांना दीर्घ सुटी असते.तशीच इतर शासकीय कर्मचाऱ्यांना एक महिन्याची 'अर्जीत रजा' असते.उलट ते वाटेल तेव्हा ती उपभोगू शकतात.मात्र शिक्षकाला ती सक्तीने मुलांबरोबर घ्यावी लागते.इतर रजाही जवळपास त्याच नियमाने सरकारी कर्मचारी भोगत असतात.जसे महीन्यात दोन शनिवार सरकारी कर्मचारी काम करता पण शिक्षक सर्व शनिवारी काम करतो.तरी गुरुजी कसे काय जास्त रजा उपभोगतात हा संशोधनाचा विषय ठरेल.
बरं गुरुजी शिक्षणात व्यतिरिक्त ही कामे करतो.जे कुणाच्या खिजगणतीत सुध्दा नसते.खिचडी शिजवा,जनगणना,मतदान प्रक्रियेत तर गुरुजी शिवाय तर चाक हलत नाही.शिरगणती,आमुक सर्वेक्षण करा,तमूक माहिती द्या चालू असते.बरं कोणत्याही जिल्हा परिषदेच्या शाळेत लिपीत वा शिपाई नाहीत तरी सुध्दा सर्व कामे सुरळीत कशी पार पडतात.जरा शाळेत जाऊन गुरुजींचे दफ्तर तरी पहा.मग लक्षात येईल गुरुजी तारेवरची कसरत कशी करतात ते.
संपूर्ण महाराष्ट्रात लाॅकडाऊन असताना आदिवासी विकास विभागाचे शिक्षक गावपाड्यावर जाऊन मुलांना शिकवत होते.दुसरी गोष्ट आदिवासी विभाग मार्फत गरजू दुर्बल घटकातील आदिवासी जातीजमातीच्या लोकांना खावटी वाटपासाठी गावपाड्यावर फिरत होते.प्रथम सर्वे,नंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया,तद्नंतर आधार कार्ड, रेशनकार्ड, गोळा करत गुरुजी फिरत होते.त्यानंतर बॅकेचे अकाऊंट नंबर,माहितीचे संकलन,यासाठी आता पर्यंत गाव पाड्यावर दहापंधरा चक्रा मारत आहेत.आज दोन वर्षांत किती तरी शिक्षकांना कोरोनाची बाधा होऊन जीव गमवावा लागला आहे.अजूनही शिक्षक खावटी वाटपासाठी फिरत आहेत.शासनाकडून एक छदाम सुध्दा शिक्षकांना मिळाला नाही.कारण एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे सामाजिक बांधिलकीतून तो धडपडत राहिला.पदरमोड करून अजूनही तो भटकतो आहे.कोणत्या खात्यातील कर्मचारी जीवावर उदार होऊन फिरत होते? कोणीही नाही मग गुरुजी पगार फुकट कसा घेतो.कुणी सांगाल का?एवढे सारे करून तरी ही त्यांने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले नाही.एकीकडे खावटी तर दुसरीकडे मुलांच्या घरी जाऊन ज्ञानाची शिदोरी देतच होते.कोराना काळात तो देशाचा आधारस्तंभ झाला होता. सतत काहीना काही तो करतच होता.तरी गुरुजी फुकट पगार कसं घेतो.कुणी सांगाल का?
श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
शहापूर,जि.ठाणे
9404608836
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा