कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

शनिवार, २१ मार्च, २०२०

कोरोना आणि दहशत !!!

कोरोनाच्या भीतीचे सावट

गेल्या महिनाभरापासून जगामध्ये कोरना या आजाराने थैमान घातले आहे. चीन पासून सुरू झालेला हा रोग आता जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचला आहे. चीन नंतर सर्वाधिक कोरोनाची झळ पोहोचणार देश म्हणजे इटली. जगातील विकसित राष्ट्रांत सह विकसित राष्ट्रांवर हे संकट आलेले आहे. कदाचित विकसित राष्ट्र या रोगाचा सामना धैर्याने करतील पण गरीब राष्ट्रांचे काय.? हा प्रश्नही अनुत्तरित राहतो.जगात जवळजवळ पावणे दोन लाख इतकी जनता कोरोना ग्रस्त झाली आहे.संपूर्ण जग कोरोनाच्या दहशतीखाली वावरत आहे. भारतातही सध्या कोरना आपले हातपाय पसरू लागला आहे. त्यातल्यात्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत.आजमितिला महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 65 इतकी झाली असून ;प्रमुख्याने पुणे, आणि मुंबई , या महानगरांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्यातरी या रोगावर ठराविक असं औषध उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेणे हाच या रोगावरील सर्वोत्तम उपाय आहे.
                          ‌    पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनानुसार.दि. २२मार्च दोन २०२० रोजी भारतीय नागरिक स्वयंस्फूर्तीने संचारबंदी पाळणार आहेत. परंतु लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की; ही संचारबंदी फक्त 22 तारखे पुरती मर्यादित आहे; की वाढवली जाईल. जर पुढे वाढवली गेली तर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होईल.आजच बाजारामध्ये सॅनीटायझर, हॅन्ड वॉश,मास्क यांचा बाजारात तुटवडा निर्माण झाला असून दुकानदार ग्राहकाकडून अव्वाच्यासव्वा रक्कम वसूल करत आहेत. हीच गोष्ट जर जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत घडली ;तर नागरिकांना अजून एका मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सरकारने वेळीच योग्य पावले उचलून. जीवनावश्यक वस्तूंचा साठे बाजार होणार नाही. याची दक्षता घेणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनीही ही स्वयंस्फूर्तीने संचारबंदी पाळून या राष्ट्राच्या आलेल्या संकटावर धैर्याने तोंड दिले पाहिजे. तरच आपण कोरोनासारख्या आजाराशी सामना करू शकतो.
                 जगातील इतर राष्ट्रांशी तुला केली तर; भारतात कोरोना आजाराचा फैलाव इतर देशांच्या तुलनेत फारच नगण्य आहे. कदाचित भारतीय हवामान कोरोना व्हायरस साठी योग्य नसेल; पण नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करता कामा नये; की रुग्णांची संख्या कमी न होता. दिवसेंदिवस ती थोड्या प्रमाणात का होईना वाढतच आहे. आपण याला वेळीच पायबंद जर घालू शकलो नाही; तर आपल्या राष्ट्रावर मोठी आपत्ती आल्यावाचून राहणार नाही.अगदी 1919 रोजी म्हणजे बरोबर शंभर वर्षांपूर्वी जगात अशाच एका आजाराने थैमान घातलं होतं त्यावेळी जगाची 5% इतकी लोकसंख्या कमी झाली होती भारतातही या रोगाने मोठा हादरा दिला होता जवळ जवळ दोन कोटी जनता याच्यात मृत्युमुखी पडली होती. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. पण आताची परिस्थिती जरी बदलली असली तरी रोग नवीनच आहे. त्यामुळे सध्यातरी आपल्याकडे यावर कोणताही ठोस उपाय नाही. तेव्हा आपण सर्वांनी आपली स्वतःची काळजी घेण्याबरोबरच दुसऱ्यांची काळजी घेऊ. गर्दीच्या ठिकाणी आपण जाणार नाही  गेलो तरी ,मी माझी स्वतःची आणि लोकांचीही काळजी घेईन विशेषतः लहान मुलं आणि वयोवृद्ध माणसं यांना आपण गर्दीपासून लांब ठेवूया आणि कोरोना मुक्त भारत करू या!


बुधवार, १८ मार्च, २०२०

कोरोनाला रोखावेच लागेल !!

जगभरात कोरोनाच्या महामारीने थैमान घातला आहे . सर्व जगात  हाहाकार उडाला आहे. जगभरात माणसं भीतीने घराबाहेर पडायला घाबरत आहेत. प्रत्येकाच्या डोक्यावर मृत्यूचा सावट आहे. वैद्यकशास्त्रा पुढे कधी नव्हे इतका मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. हा रोग आवरायचा कसा म्हणून डॉक्टरही चिंतेत आहेत. आज आपण यावर वेळीच उपाययोजना केली नाही तर जगाचे भविष्य फार अंधकार असेल. चीन पासून सुरू झालेल्या या रोगाचा प्रसार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. भारतातील मुख्य शहरात हा रोग पसरला असून मुंबई,दिल्ली, कोलकत्ता,या महानगरांमध्ये हा रोग वाऱ्यासारखा पसरत आहे.
                     कोरणा हा रोग संसर्गजन्य असून त्याची लागण तात्काळ आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना होते. त्यामुळे या रोगाविषयी खबरदारी घेणे हाच या रोगावर जाळीम उपाय होय. चीन आणि भारत या दोन देशांचे समान सूत्र म्हणजे या दोन्ही देशांची अतिलोकसंख्या होय. रोगावर प्रतिबंध करण्यासाठी आपणास फारच खबरदारी घ्यावी लागते .दुसरी गोष्ट या देशांमध्ये या रोगाविषयी लोकांमध्ये आज्ञा आहे. लोकांमध्ये अज्ञान असून नक्की प्रसार कशामुळे होतो याविषयी लोक साशंक आहेत .त्यामुळे हा रोग प्रसार थांबवण्यासाठी खबरदारी बरोबरच लोकांमध्ये जनजागृती करणे. हे एक मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून या शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा होत असते त्यामुळे या शहरात जंतूसंसर्ग रोखण्यासाठी गर्दीवर कसा ताबा मिळवता येईल यावर लक्ष केंद्रित करणे आपले आद्य कर्तव्य ठरते. सरकारने याविषयी सखोल विचार करून मुंबई,दिल्ली, कोलकत्ता,चेन्नई,या महानगरांमध्ये  संचारबंदी लागू करणे गरजेचे आहे. यामुळे देशाचा आर्थिक विकास घटला जाईल; पण "सर सलामत तो पगडी पचास" या अर्थाने आपल्याला नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी आर्थिक संकटाला ही सामोरे जावे लागेल.
                       खरं तर भारत सरकारने दोन आठवड्यापूर्वीच शटडाऊन करायला हवे होते. त्यामुळे या रोगाला भारतात हात-पाय पसरवण्यासाठी संधीच मिळालीच नसती; परंतु आपण याबाबतीत मागे पडलो. आणि इतर देशातील नागरिक या देशात आले. आणि बरोबर कोरणा सारखा महाभयंकर रोग घेऊन आले. हे आपल्याला रोखता आले असते पण केव्हा आपण पंधरा दिवसांपूर्वीच शटडाऊन करायला हवं होतं. आज इटलीमध्ये संपूर्ण देशात संचारबंदी लागू असून एकही नागरिक रस्त्यावर दिसत नाही. अशा प्रकारची खबरदारी जर भारत सरकारने रोग पसरण्यास अगोदरच घेतली असती,; तर आज जे दीडशे रूग्ण भारतात आढळले. तेसुद्धा आढळले नसते.जेव्हा देशाचं भविष्य पहायचं असतं तेव्हा काही गोष्टींच्या बाबतीत कठोर निर्णय घ्यावे लागतात. तसे कठोर निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. आज देशातील दीडशे रुग्णांपैकी एकट्या महाराष्ट्रात 44 रुग्ण आढळले आहेत आता तरी महाराष्ट्र सरकारने बस, रेल्वे,इत्यादी शंभर टक्के बंद करून या रोगाला हातपाय पसरण्यास संधी देऊ नये. अन्यथा वेळ निघून गेल्यावर किंवा परिस्थीती हाताबाहेर गेल्यानंतर आम्हाला काहीच करता येणार नाही. त्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी घोषित करून भविष्यात ओढणाऱ्या संकटाला आत्ताच दोन हात करता येतील. तेव्हा कृपया उद्धव साहेबांनी शुभस्य शीघ्रम करून या रोगाला महाराष्ट्रात हात पाय पसरण्याची संधी देऊ नये.


बुधवार, ६ मार्च, २०१९

डीटीएच ग्रहकांनो, मोहात पडू नका

. भारत सरकार द्वारा डीटीएच सेवा अधिक पारदर्शक करण्यासाठी तसेच वापरकर्ता ग्रहकांवर अधिक बोजा पडू नये म्हणून अलिकडेच. सरकार ने डीटीएच सेवा पुरवणा-या कंपन्यांना काही नियम घालून दिले असून त्या द्वारे ग्रहकांना.आपल्या मनाप्रमाणे आवडत्या व आपण पाहत असलेल्या वाहिन्या निवडन्याचे स्वातंत्र्य दिले असून आपण पहात असलेल्या वाहिन्यांचेच त्याला पैसे द्यावे लागणार आहेत. परंतु केबल चालक आणि डीटीएच कंपन्या ग्रहकांची दिशाभूल करत आहेत. खरे तर प्रत्येक घरात काही ठराविक वाहिन्या पाहिल्या जातात.परंतु केबल चालक व डिटीएच कंपन्या ग्रहकांना आम्ही कमी पैशात खूप वाहिन्या दाखवतो पण सरकार त्या पासून तुम्हाला वंचित ठेवत आहे. असे चित्र तयार करत आहेत. सरकारने कंपनीला प्रत्येक वाहिनीचे मूल्ये जाहीर करायला लावले असून. ते वीस रुपया पेक्षा जास्त नसावे असे आदेश ही दिले आहेत. परंतु केबल चालक व डिटीएच कंपनी यांनी नवीन क्लृप्ती लढवली असून. पॅकेजच्या नावाने पुन्हा आपल्या वाहिन्या तुमच्या माथी मारण्याचे उद्योग सुरू केले आहेत. तेव्हा वाहिन्या निवडताना आपण पहातो अशाच वाहिन्या निवडा.दुसरी गोष्ट. कमी पैसे असणा-या वहिनींन्या प्राधान्य द्या.मक्तेदारी असणा-या कंपन्यांनी आपल्याला गृहीत धरले असून हे सर्वच ग्राहक आपली वाहिनीला विकत घेतलीच असे गृहीत धरले आहे. तेव्हा, कमी किंमत असणा-या वाहिन्या निवडा. आपण पॅकेजच्या मोहात पोडलो तर नपहाणा-या वाहिन्या कंपन्या आपल्या गळी उतरवतील.आणि सरकारचा ग्राहक हिताचा हेतू असफल होईल. आपण ही वाहिन्यांची मक्तेदारी मोडीत काढल्यास या कंपन्यांची ग्राहकांची संख्या घटले ग्राहकांची संख्या घटल्यास जाहिरात कंपन्यां अशा वाहिन्यांकडे जाहिराती देणार नाही. परिनमतः डीटीएच कंपनीला आपले मूल्ये कमी करावे लागेल.कारण वाहिनी मालकाचा नफ्याचा मुख्य श्रोत हा जाहिरातींतून मिळणारा पैसा असतो.तेव्हा ग्रहकांनो सावधान पॅकेजच्या भूलभुलैयाला बळी पडू नका.

शुक्रवार, २५ जानेवारी, २०१९

सामर्थ्य आहे चळवळींचे


सामर्थ्य आहे चळवळींचे

विविध क्षेत्रांतील चळवळीनी नेमकी  काय केले?
"सामर्थ्य आहे चळवळींचे जो जे करील तयांचे ."असे संत रामदास स्वामी म्हणतात.खरोखरच चळवळी मध्ये सामर्थ्य आहे.आज असंख्य वेगवेगळ्या क्षेत्रामधे. आपल्या न्याय व हक्कासाठी तसेच समाज उत्थान. घडविणा-या चळवळी उभ्या आहेत. त्या किती प्रमाणात स्वतःशी प्रामाणिक आहेत या यक्ष प्रश्न आहे. जेंव्हा चळवळ उभी रहाते उद्देश फार प्रामाणिक असतो. पण नंतर चळवळ वेग घेऊ लागली की चळवळेतील नेते मंडळी सरकार च्या दावणीला
बांधले जातात,किंवा विकले तरी जातात .चळवळ उरते नावा पुरती.शरद जोशींची शेतकरी वर्गाच्या हितासाठी शेतकरी संघटनेची बांधणी केली.तिचा परिणाम ही दिसू लागला.पण कुठे पाल चुकचूकली कुणास ठाऊक? .नवीन संघटना तयार झाल्या नि चळवळ पुढे सरकू शकली नाही. खरे तर सर्वात असंघटीत घटक म्हणजे शेतकरी. असंख्य मागण्या आहेत त्याची ही गरज आहे. पण शेतकरी एकसंघ राहू शकला नाही. परिणामतः सरकायचं फावलं नि शेतकरी देशोधडीला लावलं.कामगार हितासाठी संघटना हवीच पण असंख्य संघटना त्यामुळे कामगार आजही असंख्य मागण्या पासून उपेक्षित आहे. काही कामगार नेते सरकारचे मांडलिक झाले. आणि चळवळीची वाट लागली. आज सरकार विरोधात निघणारे मोर्चे कष्टकरी वर्गात किती असंतोष आहे. हे संगतात.
             विद्यार्थी चळवळ अपेक्षित यशस्वी झाल्या नाहीत. या चळवळी राजकीय पक्षांचे स्टॅप घेऊन. उतरू लागल्या. परिणामतः विद्यार्थी चळवळ ही हवी त्या गतीने पुढे जाऊ शकली नाही. प्रस्थापित सरकार विरुद्ध विद्यार्थी असाच संघर्ष पाहायला मिळतो .त्यात विद्यार्थी राजकीय झेंडे घेऊन उतरले."विरोधासाठी विरोध.की गरजेसाठी विरोध." हे एक कोडे आहे.राजकारणी विद्यार्थ्यांचा अपमतलब म्हणून वापरू लागले. 
               साहित्यात  ही चळवळी आल्या. जाती धर्मानुसार पुढे प्रवाह वाढले.प्रांतिय स्वरूप प्राप्त झाले. मग पुन्हा. विदर्भ, मराठवाडा, कोकण,यामध्ये वेगवेगळे गटतट तयार झाले.खरे तर साहित्य चळवळी वाढणे म्हणजे समाज उत्थान घडविणे हा मुख्य उद्देश होता. त्यातून वैश्विक साहित्याची निर्मिती व्हावी.जनमानसात साहित्याची चर्चा व्हायला हवी पण तसे होताना दिसत नाही. काही साहित्य चळवळी केवळ नावापुरत्या आहेत. काही पुरस्कार देण्यापुरत्या बरं पुरस्कार लायक साहित्यिकाला द्यावा पण येथे वशिल्याने पुरस्कार वाटले जातात. काही चक्क विकतात.नि दस्तूरखुद्द आमचा साहित्यिक ते पुरस्कार विकत घेतात सुध्दा. काही साहित्यिक संस्था आपल्या जवळच्या साहित्यिकाला पुरस्कार वाटतात.तू ओळखिचा तू जवळचा असे पुरस्कार स्वतःची आणि चळवळीची हानी करून घेतात.चळवळीचा उद्देश दूर रहातो नि चळवळ वांझोटीच रहाते.
               मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेना ही राजकीय चळवळ उदयास आली. काही अंशी मराठी माणसांना ती आपली वाटली.पण चळवळीचा हवा तसा मराठी माणसांनी हात दिला नाही. त्यातून ही राजकीय चळवळ.कुणाला रुचली.कुणाला पचली नाही.राजकीय चळवळ त्यामुळे सगळ्या मराठी माणसांचा पाठींबा लाभला नाही. आणिआपणा सर्वांना महीत आहेच पुढे काय झाले? त्या ही पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही राजकीय चळवळ मराठी माणसांच्या हक्कासाठी नवीन पक्ष म्हणून उभी राहिली.येथे ही मराठी माणूस या चळवळी पासून दूर गेला.राज ठाकरे या मराठी माणसांला ऐकायला लोक लाखोच्या संख्येने येतात पण मतपेटी मात्र रिकामी रहाते.येथे राज ठाकरेंना मत दिले म्हणजे चळवळ यशस्वी झाली असं मला म्हणायचे नाही. तर किती मराठी अस्मितेचे प्रश्न सुटतात या वर या चळवळीचे यशापयश अवलंबून आहे. 
          थोडक्यात काय चळवळींचे यशापयश. त्यात काम करण्या-या कार्यकर्त्यांच्या हातात आहे.पुरस्कारा.दिल्याने ती संस्था मोठी होत नाही. तर ती व्यक्ति त्या संस्थेला मोठी करते. दिडदमडीला जे कामगार नेते विकले जातात. त्या कामगार चळवळींचे भविष्य अंधःकारमयच .खरी सचोटी नि प्रामाणिकपणा हा चळवळींचा आत्मा असतो.आणि हे जर चळवळीतील कार्यकर्त्यांकडे नसेल तर चळवळ वांझोटीच. म्हणून आम्हाला आजच्या चळवळी काहीच देऊ शकल्या नाही हे माझे प्रामाणिक मत आहे. 

प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे 
मु. :--पोई, पो. :-- वाहोली. ता. :--कल्याण जि.ठाणे. 
9404608836

शनिवार, १२ जानेवारी, २०१९

परपुरुष


परपुरुष

तिला आवडायचे परपुरुष
आणि त्यांचा सहवास
तिचे आयुष्य असेच
रांडेचा हवास
आयुष्यभर ती
स्वप्ने दुस-याची पहायची
गंगा गटार झाली .
गटार होऊन रहायची.
कोण पुरुष तीला
खूप खूप आवडायचा
नवरा तिचा बाहेर
तो तिचा होऊन जायचा
ती करायची पूजा त्याची
तो सात जन्म आपला व्हावा.
या जन्मी भोगले
आता सातजन्म मागते.
ती रांडच होती.
तीला नेहमी दुस-यांचे
गोड लागते.
रोज रोज ती परपुरुष भोगते.

श्री धनाजी जनार्दन बुटेरे
कल्याण ठाणे

सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

ललित बंध (बायको आणि आई )

                     बायको आणि आई

                       प्रेम हा अडीच अक्षरी शब्द. या शब्दाभोवती मानवी जीवन फिरते आहे. आणि हे प्रेम आपली ओंजळ भरून देणारी सगळ्यांची आई.पण या आईच्या वाट्याला मात्र प्रेमाचा दुष्काळ.आई जीव ओवाळून टाकते.कदाचित जीव ही देते.पण बरीच मुले.कृतघ्न निघतात.खरे तर आईचे ऋण नविसरता येण्या इतपत.पण तरी कालपरवा आपल्या जीवनात आलेली एक सहचारी आपले सर्वस्व बनते. असे काय आहे पत्नीकडे.? आणि काय नाही आईकडे?. मला मात्र प्रत्येकाची आईग्रेट वाटते.
          साधारण नव्वद चे दशक होते. माझे काॅलेज सकाळी सातचे.त्यासाठी पहिली बस सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी.मी घर सोडत होतो.पाच चाळीस ला कारण बसथांबा  अगदी जवळ होता.पण एवढ्या सकाळी. माझी आई मला गरमगरम भाकरी आणि भाजीची न्याहारी द्यायची. ती पण सकाळी साडे पाच वाजता.गरम गरम चहा.अगदी आंघोळ केली की हातात पडायचा.बाथरूम मधे चड्डी टाॅवेल तयार असायचे.ते पण सकाळी पाच वीसला.कधी कंटाळा नाही की आदळाआपट नाही की कधी त्रागा नाही. की मी फार खस्ता खाते म्हणून टोमणा नाही. की कधी घाई झाली म्हणून उपाशी जावं लागलं असे नाही. रोज डबा. आणि ढेकर देत बाहेर पडायचो.पण मी हा समाधानाचा ढेकर द्यावा म्हणून माझी माय सकाळी भलभल्या पहाटे थंडी पावसात झोपमोड करून उठायची. कधी झोप मोडली म्हणून धुसफुसत नव्हती की उपकारांची भाषा नव्हती.बरं तिला काय एवढंच काम नव्हते. ती आमच्या आख्या संसाराचा गाडा एकटीच ओढायची.दिवसभर शेतात राबायची.काबाडकष्ट करायची.आणि झोपायला. रात्रीचे बारा नित्याचेच.तरी पहाट होऊन आई उगवायची. यात माझ्या पूर्ण काॅलेजच्या पाचसहा वर्षात खंड पडला नाही. हे माझीच आई करते असे नाही जगातल्या सर्वच आया करतात.पण मग मुले त्या बदल्यात आईला काय देतात.?
            त्यानंतर बरीच वर्षे गेली. मला नोकरी लागली.लग्न झाले मुलं झाली. आता मी सकाळी घर सोडतो पण पूर्वीसारखा सकाळी  सहालाच नाही .मी घर सोडतो सकाळी नऊला पण तरीही हातात डबा मोठ्या घाईगडबडीने पडतो .कधी डब्यासाठी ताटकळत बसावे पण लागते.सकाळची न्याहरी जवळ जवळ लोप पावत चालली आहे.कारण.आमच्या सौं ना खूप कामे असतात.रात्री उशिरा झोपते.आणि मग सकाळी उशीर होतो.मुले सकाळी साडे सातला घर सोडतात पण रोजच गाडीवाला वाट पहात बसतो.     शनिवारी सकाळी शाळा असते तेव्हा सारे आटपून मी घरात बाहेर पडे पर्यंत आमच्या सौ.ना पत्ता नसतो.कारण शनिवारी मुलांची शाळा नसते.मग         काबाडकष्ट करून भल्या पहाटे चार ला नचुकता उठणारी आई रोज आठवते.कारण सकाळी चारला ऊठून. आंघोळ करून. देवघरात लख्ख दिव्यानें घर उजळून टाकणारी आई.आणि रोजच देवघरातला दिवा उजळवण्याचे भाग्य माझ्या ओंजळीत टाकणारी पत्नी. किती जमिनआसमानचा फरक सांगते.तरी ही बरीच मुले हे विसरतात. आणि बदल्यात आईला मिळते काय? हेलसांड,अवहेलना, तिरस्कार, आणि उतार वयात पुन्हा काबाडकष्ट.
          आईला जगायला प्रेम लागते.सहानुभुती लागते.मायेचा ओलावा लागतो.आणि सगळ्यात महत्वाचे मायेची उब लागते.जी तिच्या वाट्याला फार कमी येते.वरील उदाहरण प्रत्येकाच्या आयुष्यात थोडे बहुत सारखे असते.पण काही बायका याला आपवादही असतील.तेव्हा. त्या प्रेमाच्या हकदार आहेत. पण आईच्या मायेची सर बायकोला कशी येणार. ?

प्रा.श्री. धनाजी जनार्दन बुटेरे
कल्याण ठाणे
फोन 9930003930