कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

मंगळवार, १२ मे, २०२०

चैतन्याचा झरा



चैतन्याचा झरा

ही गोष्ट आहे 2000 मध्ये मी बीए ला होतो. घरची परिस्थिती जरा बेताचीच होती मला बीए करून बीएड करायचं होतं कारण माझे ध्येय होतं शिक्षक होणे त्यावेळेस अनुदानित साठी 14 हजार रुपये आणि विनाअनुदानित साठी चाळीस पंचेचाळीस हजार रुपये  एवढे चाळीस पंचेचाळीस हजार रुपये भरण्यास मी असमर्थ होतो.जर चांगले मार्क मिळाले तर माझे बी.एड.फक्त चौदा हजार रुपयांमध्ये होणार होते.
मग माझ्याकडे एकच पर्याय शिल्लक होता चांगले मार्क पाडणे.त्यामुळे बीए ला प्रथम श्रेणी मध्ये येण्यासाठी माझी धडपड सुरू झाली.मी गावात रहात होतो.माझे गाव कल्याण पासून वीस किलोमीटर अंतरावर आहे.गावात घरी सतत मित्र,माणसे यांचा राबता असायचा.त्यामुळे मला अभ्यासात सतत व्यत्यय यायचा.मग मी घरा पासून दहा पंधरा मिनिटे चालायला लागतील एवढ्या दूर अंतरावर आमराईत
आंब्याच्या झाडाखाली जाऊन अभ्यास करायचो.दुपारी दोन वाजेपर्यंत मी असल्यास करायचो मग जेवण करून ताबडतोब पुन्हा आमराईत जायचो.माझी ही केविलवाणी धडपड पाहून मग आई रोज भर दुपारी रणरणत्या उन्हात माझ्यासाठी जेवणाचे भरलेले ताट हातात  पाण्याचा तांब्या (तेव्हा पाण्याच्या बाटल्यांचा जन्म झाला नव्हता) घेऊन आई वाट तुडवत यायची.मी आईच्या समोरच हात धुवायचे आणि पटापट चार घास पोटात घालायचो. मग आईच्या पदराला हात पुसून पुन्हा अभ्यासाला लागायचो.मला हे जगातले सगळ्यात मोठे सुख वाटायचे.मी  सकाळी सात ते संध्याकाळी साडेसात पर्यंत जोपर्यंत डोळ्यांना दिसते.तोपर्यंत मी वाचत राहायचो.पण आंध्र पडून गेला की आईचे डोळे वाटेकडे लागायचे.जास्तच उशीर झाला की आई मला शोधत आमराईत यायची.जगात एवढे प्रेम फक्त नि फक्त आईकडे असते.आता आई रक्त चालली आहे.आयुष्याचे काही वर्ष शिल्लक राहिले आहेत.पण हा प्रेमाचा झरा अजून आपला नाही. तो कधी अटूच नये.माझे वडील तर लहानपणच माझा हात आईच्या हाती देऊन दूर निघून गेले.पण आईच्या प्रेमाचा निखळ  झरा माझ्यासाठी ठेऊन गेले.तोच मायेचा झरा माझ्या आयुष्यात चैतन्य आणतो.याच झ-याच्या ओढीने शाळेला सुट्टी लागली की पाय आपोआप माझ्या जन्मगावी धाव घेतात.
श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
कल्याण ठाणे



मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

आजची स्री

आजची स्त्री

                          परमेश्वराची सर्वात सुंदर कलाकृती म्हणजे स्री. याच स्त्री देहाचा प्रत्यक्ष मोह परमेश्वराला सुद्धा आवरता आला नाही. म्हणून श्रीविष्णूने तिलोत्तमा या अतिसुंदर स्त्री स्वरूप धारण केले. स्त्री म्हणजे मांगल्य,  वात्सल्याची मूर्ती,त्यागाचे निस्सीम रूप, स्त्री म्हणजे करुणेचा सागर,  स्त्री हणजे ममतेचा झरा,अशा असंख्य रूपात आपणास स्त्री भेटते.  कालानुरूप तिच्या भूमिका थोड्या फार बदलत गेल्या. पण आई म्हणून तिची भूमिका आबादित आहे.अगदी अठरा-एकोणीसव्या शतकापर्यंत तिची भूमिका "चूल आणि मूल" एवढीच होती. पण एकविसाव्या शतकातील रुढी-परंपरा यांच्या बंधनातून मुक्त झाली. तरीसुद्धा काही सामाजिक बंधनात ती आहेच.
अठराव्या शतकाच्या अखेरीस स्री भयानक अशा यातना सहन करत होती. सामाजिक रूढी परंपरा यांची बळी स्त्री ठरली होती. त्यातील 'सतीप्रथा' पतीच्या मृत्यूनंतर तिला जिवंत चितेत प्रवेश करावे लागत असे.
आणि तिने असे केले नाही तर समाजातील कर्मठ मंडळी तिला त्या चितेत ढकलत असत.आणि स्त्रीच्या मरणाचा तमाशा समाज पाहत असे. तिच्याच प्रतिकार करण्याइतकी शक्ती नव्हती बिचारी गुमान सहन करत असे  तो काळच असा होता.उंबरठा ओलांडायाची स्रीला मुभा नसे.म्हणजे ती घराबाहेर पण जावू शकत नव्हती. समाज सुधारक राजाराम मोहन राॅय यांनी कडाडून विरोध केला.लार्ड बेटींग यांनी सतीप्रथे विरुद्ध कायदा तयार केला.संकटातून मुक्तता होते न होते तोच केशोपण पद्धत सुरू झाली.धर्ममार्तंडांनी नवा डाव रचला पुन्हा बळी स्त्रीचा.एकीकडे बालविधवा हा प्रश्न गहन होता. लहानपणी लग्न झालेल्या मुलीचा नवरा दोघेही वयात येण्याअगोदर पतीचे निधन व्हायचे.आणि जन्मभर विधवा म्हणून जागायची.अशाने एखादी विधवा तारुण्यात यायची आणि वाकडे पाऊल पडायचे.आणि कुमारिका माता म्हणून हिण आयुष्य जगायची.समाजातून त्रास व्हायचा मग बिचारी स्वतःचा आणि त्या अर्भकाचा बळी द्यायची. नाही तर विधवा म्हणून आयुष्य कुंठीत बसायची.या प्रथेतून मुक्त व्हायला बराच काळ लोटला पण महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी या प्रथेतून महिलांना मुक्त करण्याची पहिले पाऊल उचलले आणि विधवा विवाहास सन्मानाने होऊ लागल्या त्यातूनच जेरठविवाह प्रथा सुरु झाली.म्हणजे बाल विधवेचा एखाद्या म्हाताऱ्या पुरुषाबरोबर लग्न लावून देणे.मुलगी कुठे तरी तोंड काळे करेल. या भीतीने आई-वडिलांकडून हे पाऊल उचलले जाई.
             स्त्रीमुक्ती ची खरी पहाट उगवली ती 1853 मध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये भिडे वाड्यात सुरू करून स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून उदयास आल्या महिलांच्या डोक्यावरची पाटी जाऊन हातात अक्षराची पाटी आली या युगाच्या युगप्रवर्तक सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले हे दांपत्य होय.
               मुली शिकू लागल्या अक्षरांशी बाईची दोस्ती झाली. आनंदीबाई जोशी सारखी महिला डॉक्टर झाली बाई बाहेरच्या जगात पडली परदेशात महिला मुक्त श्वास घेत आहेत. मात्र भारतात अजूनही  स्त्री गुलाम आहे.याची जाणीव त्यांना झाली. यातूनच जागृती होऊन स्त्रीस्वातंत्र्याच्या चळवळींनी जोर धरला. शिक्षणाच्या प्रगतीचे स्रीला आकाश ठेंगणे वाटू लागले. नव्या युगाची सुरुवात झाली.म्हणता म्हणता एकविसावे शतक उजाडले शिक्षणाने स्त्री शहाणी झाली. तिला आत्मभान आले.स्व ची जाणीव झाली. ती उत्तुंग भरारी घेऊ लागली.नऊवारीतील स्त्रिया सहावारीतून पंजाबी आणि पंजाबातून कधी जीन्स मध्ये आली कळत नाही. आणि संकल्पना बदलून गेली स्त्री नोकरी करू लागली.ती ऑफिसमध्ये कामा करू लागली. आरक्षणाच्या बळावर तीन उच्च पदाची नोकरी पदरात पाडून घेतली.ती ऑफिसात बॉस म्हणून मिरवू लागली. सर्व क्षेत्रात तिने आपला ठसा उमटविला.असे कोणतेच क्षेत्र नाही जेथे तिने स्पर्श केला नाही स्वर्गीय इंदिरा गांधींच्या रुपाने ती पंतप्रधान पदावर विराजमान झाली. तर श्रीमती प्रतिभा पाटील यांच्या रूपाने ती राष्ट्रपती हे भारताचे सर्वोच्च पद भूषविले. ती सध्या मुक्त स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहे.
              पण या मुक्त स्वातंत्र्याचा आजची स्त्री अतिवेक करत आहे.नऊवारीतील स्री जीन्स पर्यंत आली तर ठीक आहे. पण मुक्त स्वातंत्र्याच्या नावाने ते कमी कपड्यात वावरू लागली.जीन्स तीची गरज होती.पण शरीर प्रदर्शन करावे.म्हणजे मुक्त स्वातंत्र्याचा कडेलोटच ती स्वैराचाराने वागू लागली.तिला वाटायला लागला परदेशात तर स्त्रीया कमी कपडे घालतात.आपण घातले तर बिघडेल कुठे? असा प्रश्न तीला पडला .पण भारतीय संस्कृती आदर्श संस्कृती आहे म्हणून किमान आपल्या संस्कृतीचा मान राखायला हवा.सध्या पब पासून बियर बार पर्यंत तीचा मुक्त  मनसोक्त वावर आहे. दारू बरोबर ती सिगरेटचा झुरका मारते. हेच का स्वातंत्र्य?
                       सध्या चित्रपट गृहात सहकुटुंब सिनेमा पाहता येईल असे चित्रपट फार विरळ उघड्या स्त्री देहाचे चित्रण दृश्यांचा भडीमार पहायला मिळतात.
आता हा चित्रपट दिग्दर्शक निर्माता पुरुष असतो.पण जीचे शरीर दाखवायचे आहे ती स्री आहे. याचे भाण आम्हाला हवे.स्रीदेहाचा बाजार मांडवा हे योग्य नव्हे.
अंगप्रदर्शन करावे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक खाजगी प्रश्न आहे.असे मला वाटले.तरी काही आंबट शौकिनांसाठी निर्माता किंवा दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून कुणी एक स्त्रीने अंगप्रर्दशन करावे हे मला तरी नपटण्या सारखे वाटते.
                                        सध्या देशात बलात्काराच्या घटनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे.याची कारणे काहीही असतील मात्र दोष स्रीलाच दिला जातो. स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण झपाट्याने खाली येत आहे.भ्रूणहत्या होत आहेत. ही गोष्ट नवरा-बायको दोघांच्या मताने होते. पण एक स्त्री आपल्या पोटातील  दुस-या स्रीची मारते.याला जबाबदार नवरा की बायको? तो जबरदस्ती करतोय अशा तक्रारी कुठेच येत नाही .भ्रूणहत्याा चोरीछुपे चालूच आहे.
                               त्याच बरोबर हुंडाबळीच्या घटना ही पुढेयेत आहेत. तक्रार सासू विरुद्ध असते म्हणजे एक स्त्री दुसऱ्या सी विषयी तक्रार करते. सासू-सुनेला छळते, मारते ,जाळते.नवरा,सासरा,ही नावै फार तुरळक असतात.दोष स्त्रियांना देत नाही पण शंकेची पाल चुकचुकते.एवढे मात्र खरे. एकत्र कुटुंब पद्धती संपली आहे. कारण मुलींना सेपरेट रहायचे असते.एकुलता एक मुलगा जर वेगळा रहायला लागला तर म्हातारे आईवडील कुठे जातील?
वृद्धाश्रमात.!
        शेवटी या भारत वर्षामध्ये. स्त्रीला सन्मान दिला जातो तिला विविध रुपात समाज पूजतो. वेगवेगळ्या रुपात पूजा केली जाते आंबा,दुर्गा,महिषासुरमर्दिनी,काळी.. समस्त भारत वर्ष पूजत असतो कारण
॥ यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता ॥
॥ यत्रौतास्तु न  पूज्यन्ते  सर्वास्तत्रा फळा ॥
याचा अर्थ असा ज्या ठिकाणी स्त्रियांना सन्मानाने वागवले जाते. तेथे प्रत्यक्ष देव संचार करीत असतो. आणि जेथे स्रिचा मान राखला जात नाही. तेथे केली जाणारी सर्व कार्य निष्फळ होतात. असा या श्लोकाचा अर्थ म्हणूनच आपला मान राखला जाईल असे वर्तन करावे तरच समाज तुमची पूजा करेल.
-------------------------------------------------------------
प्रा.श्री धनाजी जनार्दन बुटेरेे
मु.पोई.पोस्ट वाहोली .
तालुका कल्याण .जिल्हा ठाणे.
पिन कोड 421 301



शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

औदसे...!

औदसा .....!








DRAFT





तिने कुंकू लावले.
म्हणून एकच गळका.
कानाकोपरा झाला बोलका.
" बाईचं लक्षण ठीक नाही ".
कुजबूजत होता.
बायांचाच घोळका.
झुकली शरमेने मान.
विसरली भूक तहान.
'कसं सांगू बाई, ?
'कुंकू लावले की
वखवखलेल्या नजरा
नाही पडत या देहावर ,.
नवरा गेला की
नाही होता येत बाईला
हिरवीगार.
पांढ-या कपाळाला सह
वाळवंटात सारखा देह
घेऊन फिरते ती.
असंख्य डंख सोसत
जगते ती.
सकाळी सकाळी झाले
दर्शन तिचे तर एकच गजब.
विस्फारतात डोळे .
पुटपूटतात ओठ.
"कुठून आली ही औदसा"
ती जगली असती
आमावस्ये सारखी.
घेतले असते तिने
स्वतःलाच स्वतः
कैद करून
पण दोन चिल्ली पिल्लूची
असतात तिच्या काखेला.
------------  @ - @  -----------

प्रा श्रीधनाजी जनार्दन बुटेरे
मु.पोई,पो.वाहोली,
ता.कल्याण,जि. ठाणे ,
फोन  :--  ₩   9404608836


Labels: सदर कविता काॅपीराईट आहे.


शनिवार, २१ मार्च, २०२०

कोरोना आणि दहशत !!!

कोरोनाच्या भीतीचे सावट

गेल्या महिनाभरापासून जगामध्ये कोरना या आजाराने थैमान घातले आहे. चीन पासून सुरू झालेला हा रोग आता जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचला आहे. चीन नंतर सर्वाधिक कोरोनाची झळ पोहोचणार देश म्हणजे इटली. जगातील विकसित राष्ट्रांत सह विकसित राष्ट्रांवर हे संकट आलेले आहे. कदाचित विकसित राष्ट्र या रोगाचा सामना धैर्याने करतील पण गरीब राष्ट्रांचे काय.? हा प्रश्नही अनुत्तरित राहतो.जगात जवळजवळ पावणे दोन लाख इतकी जनता कोरोना ग्रस्त झाली आहे.संपूर्ण जग कोरोनाच्या दहशतीखाली वावरत आहे. भारतातही सध्या कोरना आपले हातपाय पसरू लागला आहे. त्यातल्यात्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत.आजमितिला महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 65 इतकी झाली असून ;प्रमुख्याने पुणे, आणि मुंबई , या महानगरांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्यातरी या रोगावर ठराविक असं औषध उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेणे हाच या रोगावरील सर्वोत्तम उपाय आहे.
                          ‌    पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनानुसार.दि. २२मार्च दोन २०२० रोजी भारतीय नागरिक स्वयंस्फूर्तीने संचारबंदी पाळणार आहेत. परंतु लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की; ही संचारबंदी फक्त 22 तारखे पुरती मर्यादित आहे; की वाढवली जाईल. जर पुढे वाढवली गेली तर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होईल.आजच बाजारामध्ये सॅनीटायझर, हॅन्ड वॉश,मास्क यांचा बाजारात तुटवडा निर्माण झाला असून दुकानदार ग्राहकाकडून अव्वाच्यासव्वा रक्कम वसूल करत आहेत. हीच गोष्ट जर जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत घडली ;तर नागरिकांना अजून एका मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सरकारने वेळीच योग्य पावले उचलून. जीवनावश्यक वस्तूंचा साठे बाजार होणार नाही. याची दक्षता घेणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनीही ही स्वयंस्फूर्तीने संचारबंदी पाळून या राष्ट्राच्या आलेल्या संकटावर धैर्याने तोंड दिले पाहिजे. तरच आपण कोरोनासारख्या आजाराशी सामना करू शकतो.
                 जगातील इतर राष्ट्रांशी तुला केली तर; भारतात कोरोना आजाराचा फैलाव इतर देशांच्या तुलनेत फारच नगण्य आहे. कदाचित भारतीय हवामान कोरोना व्हायरस साठी योग्य नसेल; पण नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करता कामा नये; की रुग्णांची संख्या कमी न होता. दिवसेंदिवस ती थोड्या प्रमाणात का होईना वाढतच आहे. आपण याला वेळीच पायबंद जर घालू शकलो नाही; तर आपल्या राष्ट्रावर मोठी आपत्ती आल्यावाचून राहणार नाही.अगदी 1919 रोजी म्हणजे बरोबर शंभर वर्षांपूर्वी जगात अशाच एका आजाराने थैमान घातलं होतं त्यावेळी जगाची 5% इतकी लोकसंख्या कमी झाली होती भारतातही या रोगाने मोठा हादरा दिला होता जवळ जवळ दोन कोटी जनता याच्यात मृत्युमुखी पडली होती. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. पण आताची परिस्थिती जरी बदलली असली तरी रोग नवीनच आहे. त्यामुळे सध्यातरी आपल्याकडे यावर कोणताही ठोस उपाय नाही. तेव्हा आपण सर्वांनी आपली स्वतःची काळजी घेण्याबरोबरच दुसऱ्यांची काळजी घेऊ. गर्दीच्या ठिकाणी आपण जाणार नाही  गेलो तरी ,मी माझी स्वतःची आणि लोकांचीही काळजी घेईन विशेषतः लहान मुलं आणि वयोवृद्ध माणसं यांना आपण गर्दीपासून लांब ठेवूया आणि कोरोना मुक्त भारत करू या!


बुधवार, १८ मार्च, २०२०

कोरोनाला रोखावेच लागेल !!

जगभरात कोरोनाच्या महामारीने थैमान घातला आहे . सर्व जगात  हाहाकार उडाला आहे. जगभरात माणसं भीतीने घराबाहेर पडायला घाबरत आहेत. प्रत्येकाच्या डोक्यावर मृत्यूचा सावट आहे. वैद्यकशास्त्रा पुढे कधी नव्हे इतका मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. हा रोग आवरायचा कसा म्हणून डॉक्टरही चिंतेत आहेत. आज आपण यावर वेळीच उपाययोजना केली नाही तर जगाचे भविष्य फार अंधकार असेल. चीन पासून सुरू झालेल्या या रोगाचा प्रसार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. भारतातील मुख्य शहरात हा रोग पसरला असून मुंबई,दिल्ली, कोलकत्ता,या महानगरांमध्ये हा रोग वाऱ्यासारखा पसरत आहे.
                     कोरणा हा रोग संसर्गजन्य असून त्याची लागण तात्काळ आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना होते. त्यामुळे या रोगाविषयी खबरदारी घेणे हाच या रोगावर जाळीम उपाय होय. चीन आणि भारत या दोन देशांचे समान सूत्र म्हणजे या दोन्ही देशांची अतिलोकसंख्या होय. रोगावर प्रतिबंध करण्यासाठी आपणास फारच खबरदारी घ्यावी लागते .दुसरी गोष्ट या देशांमध्ये या रोगाविषयी लोकांमध्ये आज्ञा आहे. लोकांमध्ये अज्ञान असून नक्की प्रसार कशामुळे होतो याविषयी लोक साशंक आहेत .त्यामुळे हा रोग प्रसार थांबवण्यासाठी खबरदारी बरोबरच लोकांमध्ये जनजागृती करणे. हे एक मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून या शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा होत असते त्यामुळे या शहरात जंतूसंसर्ग रोखण्यासाठी गर्दीवर कसा ताबा मिळवता येईल यावर लक्ष केंद्रित करणे आपले आद्य कर्तव्य ठरते. सरकारने याविषयी सखोल विचार करून मुंबई,दिल्ली, कोलकत्ता,चेन्नई,या महानगरांमध्ये  संचारबंदी लागू करणे गरजेचे आहे. यामुळे देशाचा आर्थिक विकास घटला जाईल; पण "सर सलामत तो पगडी पचास" या अर्थाने आपल्याला नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी आर्थिक संकटाला ही सामोरे जावे लागेल.
                       खरं तर भारत सरकारने दोन आठवड्यापूर्वीच शटडाऊन करायला हवे होते. त्यामुळे या रोगाला भारतात हात-पाय पसरवण्यासाठी संधीच मिळालीच नसती; परंतु आपण याबाबतीत मागे पडलो. आणि इतर देशातील नागरिक या देशात आले. आणि बरोबर कोरणा सारखा महाभयंकर रोग घेऊन आले. हे आपल्याला रोखता आले असते पण केव्हा आपण पंधरा दिवसांपूर्वीच शटडाऊन करायला हवं होतं. आज इटलीमध्ये संपूर्ण देशात संचारबंदी लागू असून एकही नागरिक रस्त्यावर दिसत नाही. अशा प्रकारची खबरदारी जर भारत सरकारने रोग पसरण्यास अगोदरच घेतली असती,; तर आज जे दीडशे रूग्ण भारतात आढळले. तेसुद्धा आढळले नसते.जेव्हा देशाचं भविष्य पहायचं असतं तेव्हा काही गोष्टींच्या बाबतीत कठोर निर्णय घ्यावे लागतात. तसे कठोर निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. आज देशातील दीडशे रुग्णांपैकी एकट्या महाराष्ट्रात 44 रुग्ण आढळले आहेत आता तरी महाराष्ट्र सरकारने बस, रेल्वे,इत्यादी शंभर टक्के बंद करून या रोगाला हातपाय पसरण्यास संधी देऊ नये. अन्यथा वेळ निघून गेल्यावर किंवा परिस्थीती हाताबाहेर गेल्यानंतर आम्हाला काहीच करता येणार नाही. त्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी घोषित करून भविष्यात ओढणाऱ्या संकटाला आत्ताच दोन हात करता येतील. तेव्हा कृपया उद्धव साहेबांनी शुभस्य शीघ्रम करून या रोगाला महाराष्ट्रात हात पाय पसरण्याची संधी देऊ नये.


बुधवार, ६ मार्च, २०१९

डीटीएच ग्रहकांनो, मोहात पडू नका

. भारत सरकार द्वारा डीटीएच सेवा अधिक पारदर्शक करण्यासाठी तसेच वापरकर्ता ग्रहकांवर अधिक बोजा पडू नये म्हणून अलिकडेच. सरकार ने डीटीएच सेवा पुरवणा-या कंपन्यांना काही नियम घालून दिले असून त्या द्वारे ग्रहकांना.आपल्या मनाप्रमाणे आवडत्या व आपण पाहत असलेल्या वाहिन्या निवडन्याचे स्वातंत्र्य दिले असून आपण पहात असलेल्या वाहिन्यांचेच त्याला पैसे द्यावे लागणार आहेत. परंतु केबल चालक आणि डीटीएच कंपन्या ग्रहकांची दिशाभूल करत आहेत. खरे तर प्रत्येक घरात काही ठराविक वाहिन्या पाहिल्या जातात.परंतु केबल चालक व डिटीएच कंपन्या ग्रहकांना आम्ही कमी पैशात खूप वाहिन्या दाखवतो पण सरकार त्या पासून तुम्हाला वंचित ठेवत आहे. असे चित्र तयार करत आहेत. सरकारने कंपनीला प्रत्येक वाहिनीचे मूल्ये जाहीर करायला लावले असून. ते वीस रुपया पेक्षा जास्त नसावे असे आदेश ही दिले आहेत. परंतु केबल चालक व डिटीएच कंपनी यांनी नवीन क्लृप्ती लढवली असून. पॅकेजच्या नावाने पुन्हा आपल्या वाहिन्या तुमच्या माथी मारण्याचे उद्योग सुरू केले आहेत. तेव्हा वाहिन्या निवडताना आपण पहातो अशाच वाहिन्या निवडा.दुसरी गोष्ट. कमी पैसे असणा-या वहिनींन्या प्राधान्य द्या.मक्तेदारी असणा-या कंपन्यांनी आपल्याला गृहीत धरले असून हे सर्वच ग्राहक आपली वाहिनीला विकत घेतलीच असे गृहीत धरले आहे. तेव्हा, कमी किंमत असणा-या वाहिन्या निवडा. आपण पॅकेजच्या मोहात पोडलो तर नपहाणा-या वाहिन्या कंपन्या आपल्या गळी उतरवतील.आणि सरकारचा ग्राहक हिताचा हेतू असफल होईल. आपण ही वाहिन्यांची मक्तेदारी मोडीत काढल्यास या कंपन्यांची ग्राहकांची संख्या घटले ग्राहकांची संख्या घटल्यास जाहिरात कंपन्यां अशा वाहिन्यांकडे जाहिराती देणार नाही. परिनमतः डीटीएच कंपनीला आपले मूल्ये कमी करावे लागेल.कारण वाहिनी मालकाचा नफ्याचा मुख्य श्रोत हा जाहिरातींतून मिळणारा पैसा असतो.तेव्हा ग्रहकांनो सावधान पॅकेजच्या भूलभुलैयाला बळी पडू नका.