💜💜💜💜💜💜💜💜💜💜💜
💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚
💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
काव्य स्पर्धेसाठी अधुरी कहाणी
*या मैफलीत*
मेघ दाटले आभाळी
ऊरी आठवांचा पूर
सखी वादळ होऊन
गेली माजून काहूर. ॥
किती उलघाल मनाची
लागे टांगणीला जीव.
नाही नशिबाला वाटली
उलू उलूशीच कीव.॥
सखे आठव पाऊस
त्या वादळाच्या वाटा.
घराघराचा उंबरा ;
करी आपुला बोभाटा. ॥
सखे रुसलेत सारे,
पायवाटा झाल्या बंद
तुला आठवतो सखे
हाच नाद एक छंद. ॥
तू गेलीस निघून
मी भिजतो बाहेर.
सखे कर ना जवळ
एकदा तरी माहेर ॥
फक्त एकदा पाहू दे
डोळा भरून साजणी
नाही करणार गुस्ताॅखी
माझ्या दिलाच्या मैत्रिंणी॥
सखे नाही आता येत
ऐकू पाखरांची गाणी.
रंगलेल्या मैफलीत
एक आधुरी कहाणी.॥
✒ *प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे*
पोई ; कल्याण ; ठाणे
*अध्यक्ष*
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे
(कल्याण ग्रामीण)
djbutere@blogspot.com
💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💜💜💜💜💜💜💜💜💜💜💜🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
रविवार, ११ डिसेंबर, २०१६
मराठी कविता "गुस्ताॅखी"
स्थान:
Shahapur, India
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा