कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

गुरुवार, २२ डिसेंबर, २०१६

लात मारीन तेथे पाणी काढीन

"लाथ मारीन तिथे पाणी काढीन"

                  अशी एक म्हण मराठी भाषेत आहे. ती तंतोतंत लागू होते. ती माझ्या स्वर्गीय पं.पू वडिलांना. आम्ही एकूण तीस भावंडे.मी सगळंयात छोटा. मी दहा वर्षाचा असताना वडील आम्हाला या जगात सोडून गेले.पण त्यानी जे आमच्या वर संस्कार केले. त्यामुळे जीवन सुंदर झाले.बाबांचा आणि माझा सहवास फक्त दहा वर्षाचा त्यातील तीन चार वर्षे माझ्या बालपणात गेली.तीन वर्षे बाबा अंथरुणावर खिळले होते.उरलेले तीन चार वर्षे इतकाच काय तो सहवास. यात जे आठवणींचे मोती हाती लागले. ते आज मी तुम्हाला उलगडूने दाखवितो.
             बाबांचा स्वभाव करारी होता. शिस्तीचे बाबा भोगते होते.घरात बाबांचा दरारा होता.बाबा घरात आले की घरात स्मशान शांतता असे.ते घरात शिरले की घराघरात चिंडीचिप असे.दिवे लागले की हातपाय धुऊन अभ्यासाला बसावे लागे.अभ्यासाच्या बाबतीत बाबा खूप सजग होते.हा दंडक होता. शिस्तीचे ते भोक्ते होते.त्यांचा मार म्हणजे कल्पना सुध्दा केली जाऊ शकत नाही. कर्तबगार पुरूष म्हणून आख्खे गाव बाबांच्याकडे पहात होते. बाबांचे बाबा म्हणजे माझे अजोबा लवकर वारल्या मुळे बाबांवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. बाबांना तीन भाऊ एक बहीण,बरोबर विधवा आई या सर्वांची जबाबदारी येऊन पडली.पण बाबा डगमगले नाही. चार छोट्या भावंडांना सोबत घेऊन त्यांनी. घरदार नावारूपाला आणले.माझे बाबा साधे शेतकरी होते.जमिनीवर पाच दहा एकर ती पण पावसावार् आधारीत. म्हणजे पावसाच्या पाण्यावर पिकणारी भात शेती. दुसरे उत्पन्नाचे कोणतेच साधन नव्हते. त्यामुळे बाबा कायम काबाडकष्ट करायचे. कष्ट आणि बाबा हे सूत्र होतं.वर्षभर बाबा राबराब राबायचे आलेल्या पैशातून भावंडांना शिक्षण कपडालत्ता,पाहूणे राहूले.भेटीगाठी, सणउत्सवा केले जायचे.या सर्वच गोष्टी साठी पैसा शेतातून पिकणार्या भातविकून यायचा घरात फरफट व्हायची पण बाबा ते लिलया पेलायचे त्या मुळे बाबांनी गावाजवळ आमचं शेत होतं त्या शेतात विहीर खोदण्याचा निर्णय घेतला चौघे भाऊ काही मजूर लावून विहीर पंचवीस तीस फूट खोदली.कष्टाचे चीज झाले.विहीरीला पाणी लागले.तो दिवस आनंदात गेला तीर्थ म्हणून सर्व पाणी प्यायले.घरात गोडधोड केले होते.आनंदउत्सव साजरा झाला.बाबांनी त्या विहिरीच्या पाण्यावर भर उन्हात शेती फुलविली.शेती मधे बाबांचा हात धरील असा माणूस गावात कोणी नव्हता. जे पण ते शेतात पिकवायचे ते भरघोष .त्यांच्या हातात जादू होती. नव्हे हाताला परीस होता.ते सोनं पिकवायचे. कुटुंबाचा खरी आथिर्क स्थैर्य माझ्या बाबांनी मिळवून दिले. बाबा शेती मधे वेगवेगळे प्रयोग करायचे असाच प्रयोग त्यांनी वांग्याच्या शेतीवर केला.आणि वांगी कशी पिकवावी हे बाबांनी गावाला दाखवून दिले. एक एकरात बाबा रोज हजार किलो चे पिक घेत.पण वाहतुकीच्या सुविधा अभावी. माल बाजारात पोहचवण्यासाठी खूप खर्च यायचा त्यामुळे निव्वळ उत्पन्न कमी व्हायचे. पण बाबा मुळेच गावातील काही माणसांना रोजगार मिळायला लागला.कारण वांग्याचे बोजे करून ते बाजुच्या गावात नेण्यासाठी माणसं लागायची. बाबा गावातील गरीब बापड्यांना पैसे देवून ते करून घेत.ही माणसे दोन तीन चक्कर मारत त्या मुळे त्यांना जास्त पैसे मिळत.याच वांग्याच्या शेतीतून वडिलांनी एक एकरात शेती घेतली.
            भावंडांना शिकवले. शिक्षणा विषयी फार सकारात्मक होते. आपली भावंडं शिकावी म्हणून ते आग्रही होते. त्यामुळे माझ्या दोन्ही काकांना दहा किलोमीटर चालत शाळेत पाठवत कारण बसची सुविधा नव्हती. माझे काका एवढ्या दूर जायला. तयार नसायचे त्यामुळे ते शाळेत न जाता बाहेर कुठे तरी भटकंती करून यायचे.शाळेत दांडी मारायचे. वडिलांना हे समजल्यावर ते काकांना खूप मारायचे. बाबांचा मार खूप वाईट आसायचा.जे हातात येईल त्याने ते झोडून काढायचे.बाबा मारायला लागले की सोडवायचा कुणी प्रयत्न पण करत नसे कारण बाबांचा राग सगळ्यांना माहित होता.तो दशकात ऐंशी चा होता.या वेळी सुध्दा बाबांनी एका काकाला तंत्रशिक्षण घेण्यासाठी गावापासून पंधरा किलोमीटर दूर अंबरनाथ या ठिकाणी पायी पाठवत होते.त्या काळात सुध्दा. पुढील परिस्थितीची जाणीव होती. जगात तरून जायचे असेल तर शिक्षणा शिवाय तरणोपाय नाही हे त्यानी ओळखले होतं. ते काकांच्या साठी धडपडत ते आपल्या स्वतःच्या मुलांच्या बाबतीत दूर कसे रहातील.वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांनी माझ्या मोठ्या भावाला गावापासून दूर दहा किलोमीटर शाळेत टाकले होते. गावात इतर मुले पाचवीत नंतर शाळा सोडून देत कारण गावातील पासून शाळा दहा किलोमीटर होती. त्यात सकाळची शाळा म्हणजे सात वाजता पोहचावे लागे.म्हणजे घरातून पहाटे साडेचार वाजता.भावाला घरातून पहाटे निघावे लागे.आशा परीस्थिती सुध्दा ते कधीच कोणताही विचार न करता.भावाला शाळेत दर पाठवत राहिले. कधी कधी ते स्वतः भावांबरोबर काही किलोमीटर पायी चालत जात असत.आणि पुन्हां माघारी येत असत पण ते विचारा पासून कधी ढळले नाही. आमचे एकूण आठरा माणसांचे कुटुंब होते. पण कधीच काही कमी पडले नाही. त्याचे श्रेय माझ्या वडिलांना जाते.
            वडिलांचा जनसंपर्क दांडगोबा होता. कुणापुढे त्यांनी शब्द टाकला तर तो शब्द ब्राह्म शब्द ठरायचा.त्यानी मित्र फार जमविले.ते सर्वच आम्हाला त्यांच्या पश्चात उपयोगी पडले.बाबा गावचे उत्तम पुढारीत होते. गावात त्यांच्या शब्दाला आदर होता. सगळ्यात महत्वाचे की आमच्या गावात जाती भेद फार मानला जायचा.माझे चुलत आजोबा तर एकदम कर्मठ होते. पण माझे बाबा आगदी वेगळे.ते जातीभेद मानत नसत एक गाव एक पाणवठा हे आमच्या बाबा चे विचार. पुढे ते प्रत्यक्षात आले.त्यांच्या मित्रांच्या यादी सर्वच जातीची माणसं होती. आदिवासी,दलित ,सर्वच माणसं बाबांनी जपली. आजून बाबा खूपच धार्मिक होते. ते उपास तापास करत उपास खूप कडक. ते व्रतस्थ असले की जेवायला बसले की कुणीही बोलले, झाडू मारणे,बांगड्या वाजणे,कुत्रा भुंकणे, ही कोणतीही घटना घडली की ते जेवण सोडून उठत हे सारे ये "शीवसरोदय"या ग्रंथातील सूचना पाळत त्याना शीवसरोदय चांगला माहित होते. बाबा चांगले अभिनेते होते. आमच्या गावाला एक चांगली नाट्यपंरंपरा आहे. 1960 पासून हनुमान जयंती या दिवशी. पालखी सोहळा असतो. दुसर्या दिवशी एक ऐतिहासिक नाटक गावातील नाट्य मंडळ सादर करीत .या नाटकात एक स्त्री पात्र असते.स्त्री पात्र पुरुष साकारतो.बाबांनी तीन चार नाटकात भूमिका साकारल्या त्या मध्ये सह्याद्रीचा सिंह, जाग मराठ्यांनी जाग,जावळीचा झंझार.ही काही नाटके मला आठवतात.बाबांनी. धनाजी, बहीर्जी,या भूमिका साकारल्या. मी चौथीत असताना बाबा आजारी पडले.दिवसेंदिवस आजार बळावत गेला.पण निदान झाले नाही. बाबा माळकरी होते म्हणजे शुद्ध शाकाहारी डाॅक्टर सांगत की मटन मच्छी खा तर ताकत येईल इंजेक्शन गोळ्या योग्य काम करतील.पण मेलो तरी चालेल पण आता मासाआहार करणार नाही . बाबा खरे खुरे वारकरी होते. हा पहाडा सारखा पुरुष आता मात्र हादरून गेला.बाबांना आपला मृत्यू दिसू लागला. माझी पत्नी मुले यांचे काय होणार याची चिंता त्यांचे मन नेहमी आम्हा मुलांसाठी तडफडायचा.घायाळ पक्षाला आपल्या पिल्लाची चिंता जशी सतावते.तशी वडिलांची अवस्था झाली होती. नुकतेच आमचे आठरा माणसांचे कुटुंब विभक्त झाले होते.कुटुंब विभक्त होऊन वर्ष दीड वर्ष उलटला असेल.बाबांनी आंथरून धरले होते.या वेळी सगळ्यात मोठा आधार माझ्या आईने दिला ती खंबीर पणे संकटाचा सामना करत होती.यावेळी सर्वच पैसे बाबांनी काटकसर करून ठेवलेले पैसे संपून गेले. अशा वेळी बाबांनी जमवलेला मित्र परिवार कामी आला पन्नास शंभर जी होईल ते ते देत होते. पण कुणी ही कधीच परत मागितले नाही. आईचे दागीने ही विकून टाकले. मुंबई चे सर्वच सरकारी रुग्णालये पालथी घालून झाली होती. भगतसिंह दोरे गंडणे मंत्रतंत्र. जादूटोणे सर्व करून झाले .पण नियतीच्या मनात वेगळे होते. बाबा आजारी असतांना मी बाबांच्या कायम जवळ असायचोला या दहा वर्षात सुध्दा पुष्कळ कळत होते. मी बाबांची खूप सेवा केली. त्याचे पाय चेप माॅलीश कर पाण्याच्या बासरीने अंग शेकव .मलाही कळले होते बाबा आता थोड्याच दिवसाचे पाहूणे आहेत. बाबा मला अंथरुणात पडल्या पडल्या नेहमी सांगत आता मी जगणार नाही पण मी गेल्यावर शाळेत जाऊन शाळा सोडू नकोस. मोठा साहेब हो.तो बाबांचा सल्ला नव्हता तो आशीर्वाद होता. मी सारखा चिंता करत बसायचो.बाबा गेल्यावर आपले काय? आणि एक दिवस अचानक बाबा आपली तीन चिल्ली पिल्लाची सोडून दूर च्या प्रवासाला गेले. आम्हाला पोरके करून.
✒श्री धनाजी जनार्दन बुटेरे
           पोई कल्याण ठाणे
            📞9930003930
                  Copyright

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा