कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

मंगळवार, ६ डिसेंबर, २०१६

कथा "दिल दोस्ती "

                              राणी सुंदरतेचे दुसरे नाव होतं.बावनकशीसोनं .सगळ्यात मोठी मुलगी. आईची बाबांची लाडकी वयात आलेली पोर. राणी दिसायला सुंदर ,सरळ नाक, बादामी ओठ,गोबरे गाल,पाहणारे पाहातच रहात. नखशिखांत सुंदर अशी राणी. तिच्या सौंदर्यावर नभाळणारा तरूण विरळाच. दहावी झाली नि काॅलेजात जाऊ लागली. पहिल्याच नजरेत किती घायाळ झाले.गणित नाही. घरची परिस्थिती खाऊन पिऊन सुखी. विशेष मजा मस्तीवर मुरड बसायची. सारे कसे आबादी आबाद होते. काॅलेजात दिवस आनंदाचे सरत होते. म्हणता म्हणता.एक वर्षे कसे गेले ते कळलच नाही. जसे तिचे काॅलेज मध्ये चाहते होते. तसे आपल्या शेजारी पण होते. असाच तिच्या शेजारी राहणारा राहुल तिच्या प्रेमात पडला.तसा तिला ही राहुल खूप आवडला लागला.सुरुवातीला बोलणे, मग भेटणे, मग काहीतरी निमित्त करून बाहेर भेटणे. दोघे एकमेकांची कधी झाले.ते दोघांना ही कळले नाही. त्या दिवशी घरात कुणीच नव्हते. अचानक राहूल आला.आज प्रथमच ते एवढ्या एकांतात भेटले. आणि प्रथमच ती त्याच्या उबदार मिठीत किती तरी वेळ विसावली. मग आनाभाका झाल्या.लग्नाचा विषय निघाला. पण ते शक्य नव्हते कारण गरीब श्रीमंतीची दरी खूप मोठी होती.राहूल बड्या बापाची औलाद तर राणी गरीबा घरची लेक,काही असलं तरी प्रेम आंधळे असते. म्हणून एकमेकांची झाली होती. एकमेकांवर प्रेमाची उधळण करत होते. आज आई बाबा घरात नव्हते. राणीने लहान मुलांकडे निरोप पाठवून राहूलला बोलावून घेतले. प्रेमाच्या गूजगोष्टी झाल्या. एकमेकांच्या मिठीत दोघ विसावली .राहूल ने न राहून विषय काढला " राणी आतां आपण कमी भेटणार आहोत " " का बर ?" " मला शिकण्यासाठी बाबा बाहेर गावी पाठवणार आहेत ". "मग " ? उदासपणे राणी म्हणाली " मग काही नाही " राहूल म्हणाला. "तुझं ही लग्न होणार आहे. ?" मला आशी भेट दे मी शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही.राहूल बोलला शब्दाचा मतीतार्थ राणीच्या ही लक्षात आला .दोन जीव एक झाले. दोन्र जीव धुंद झाले .ना कशाची पर्वा ना डर होता आतमध्ये प्रेमाचा मोहर होता. दोघं ब-याचवेळाने भाणावर आले. मिठी सैल झाली.घडू नये असं घडलं होतं.किती तरी दिवस राणी या स्वर्गीय सुखाच्या आठवणीत स्वार व्हायची.राहूल शिक्षणासाठी बाहेर गावी गेला होता. कधी तरी भेट व्हायची पण पूर्वी सारखी नाही. म्हणता म्हणता प्रेम विरळ होत गेले म्हणातात "प्रेम टिकवायचे असेल तर मनाला मनं घासावी लागतात. नाही तर प्रेमाला पण गंज चढतो.यांच्या बाबतीत ही असेच झाले होते. आता दोघे ही एकमेकांना विसरली होती.प्रेम आठवण होऊन डोळ्यात तरळत होते. दरम्यान संजय नावाचा एक चेहरा तिला आवडू लागला होता. दोष तिचा नव्हता. प्रेम तिला साद घालायचं.प्रेम तिच्याशी क्षण क्षण बोलायचं. तिला खुणावत होते तिचे प्रेम. शेवटी ती ही त्याची झाली तेतिचे तिलाच कळलं नाही. आता ह्रदयी संजय रहात होता. स्त्रीयांचे ह्रदय मेणाचे असते ते लवकर विरघळून जाते. ती आता संजय ची होती. भेट गावा बाहेर ओढ्यावर होऊ लागल्या भेटी वाढल्या एकांतात ती एकमेकांच्या मिठीत विसावू लागली. मन जुळली बरोबर शरीर ही.राणी चे शरीरसुख त्याचे वेसन झालं प्रेम न रहाता. राणी म्हणजे शरीरसुख देणारी. सुखवस्तू झाली होती. प्रेम एक वेगळ्या वळणावर पोहचले होते. राणी मनोमन दोघांवर प्रेम करायची दोघांपैकी जीवनात तीला कोणीही जोडीदार चालला असता.पण राहूल तीला जास्त हवासा वाटायचा. कारण कोणताही पदार्थ जास्त खाल्ला तर त्याची तृप्ती येते संजय ची तिला तृप्ती आली होती. राहूल नुसता चाखला होता. तो आजून हवा वाटायचा. दरम्यान आईला थोडी कुणकूण लागली. गांवात चर्चा होऊ लागली. "मुलगी म्हणजे काचेचे भांडे ".म्हणून घाईघाईने लग्नाचा निर्णय झाला.मुलाचा शोध सुरू झाला. मुलगी सुंदर मग मुलांची काय कमी? घरची गरीबी असली तरी मुलगी म्हणजे सौंदर्याची खाणच.पहाता पहाता एक अनुरूप मुलगा बघून लग्न पक्के झाले. मुलगा दिसायला साधारण, तो ही गरीब फक्त कर्तबगार होता. वयाने मुली पेक्षा खूप मोठा, राणी ला तो पसंत नव्हताच पण आईपुढे शहाणपण चालेना.मग गुमान नशीबात पुढे मान तुकवण्यावाचून गत्यंतर नव्हते. योगायोग पहा तिच्या नव-याचे नाव ही राहूल . एवढ्या एकच समाधान देणारा क्षण तिच्या वाट्याला नियतीने दिला होता. राहूल चे प्रेम गाडले गेले होते. प्रेमाची कबर तिच्या ह्रदयत कायमची बांधली होती. पण राहूल आता जीवंत झाला होता. ज्याला सर्वस्व अर्पण केले ते पाहिले प्रेम नावाने का होईना जीवंत राहणार होते. मनापासून एखाद्यावर प्रेम केले तर ते प्रेम पुन्हा मिळतेय याचा प्रत्यय देणारा क्षण तीच्या पुढे उभा होता. आयुष्यात राहूल नव्हता पण नाव मात्र तिच्या नावापुढे लागलं होत.नशीबाने थोडी सात दिली होती. तसा संजय नांव ही तिला चाललं असते कारण संजय ने ऐण तारुण्यात तिची तृष्णा भागविली होती. आणि ऐण तारुण्यातील सांगाती तुला यापुढे ही हवा होता. पण नियती पुढे आपलं चालत नाही. नियती आपले स्वतःचे ऐकते. लग्न झालं नि " मधूचंद्रा" चा दिवस उजाडला. तिचा नवरा मात्र खूप खूष होता. आपल्याला सुंदर सोज्वळ पत्नी मिळाली याचा त्याला गर्व वाटायचा. तिला खूप सुखी ठेवू. असे त्याला मनोमन वाटे.पण राणी त्याला उदास वाटली.मधूचंद्रासाठी ते बाहेर गावी गेले उद्देश दोघांना एकांत मिळावा हा होता. एकदुस-यांना समजून घेता यावे. "मधूचंद्र" म्हणजे चैतन्य देणारी गोष्ट. आयुष्यांतील एक सुंदर क्षण असा क्षण जो डोळ्यांत साठवून ह्रदयात जपावं .असा सोनेरी क्षण, आयुष्यभर आठवत रहातो. तो सुखद गारवा देणारा क्षण. पती दूर असताना त्याच्या सहवासाची मधुर साक्ष देणारा अविस्मरणीय क्षण. पती घरात नसताना त्याच्या अस्तित्वाचा पारिजात बहरणारा क्षण. पण अशा या चैतन्याचा झरा बहराच्या वेळी ती स्वतः ला हरवून बसली होती. गप्पा झाल्या, चर्चा झाली. पण ती हरवलेलीच होती. रात्र झाली. आणि तो भारावून टाकणार क्षण आला. यावेळी आकारातील वीजा दोघांच्या नसानसात धावतात.जगात फक्त नि फक्त ती दोघेच असतात. काही क्षणांसाठी ती या विश्वातून वजा होतात. यावेळी ती दोघे अलौकिक जगात फिरत असतात. पण तिच्या बाबतीत असं काहीच घडवलं नाही. कारण जे क्षण पतीसाठी राखून ठेवायचे ते तीने दुसर्यावर उधळले होते.त्याला चुकल्यासारखं वाटलं आपण "बलात्कार " केला असं त्याला वाटू लागले.लक्षात ठेवावा असा एक ही क्षण त्याच्याकडे नव्हता. काय समजायचं तो ते समजला. त्याने तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला. " राणी मी तुला आवडतो. "? हो ,न आवडायला काय झाले . मग हरवलेले का वाटते ?. आपलं घर सोडल्यावर दुःख होतच ना. हे तात्विक उत्तराचा रोख भाबड्या पतीच्या लक्षात नाही आलं.पुढे अशीच गप्पा चालू राहील्या बोलता बोलता कधी डोळा लागला हे राहूल च्या लक्षातपण आले नाही. म्हणता म्हणता चारपाच महिने उलटले.या चारपाच महिन्यात राणीवर असंख्य बलात्कार झाले. यात राहूल चा दोष काहीच नव्हता. पण नियतीची शिकार तो झाला होता. राणी वर लग्न लादले होते. तिला जोडिदार म्हणून प्रियकर राहूल हवा होता. किंवा निखळ सुखाची बरसात देणारा संजय हवा होता. तिला हा राहूल आवडतच नव्हता. वयाने मोठा, दिसायला जेमतेम, ना पैसा ना संपत्ती, ना घर. काय होते या राहूल कडे .तिने चुकूनही त्याच्यावर प्रेम केले नसते.पण आईच्या हवास ची ती शिकार ठरली. प्रेम हे झर्या च्या पाण्यासारखं अलगद जमिनीच्या कुशीतून वर यावे लागते.पण येथे झराच आटला होता. राहूल ने सारे मनात ठेवले. ती फक्त मनात कुढत होती. आता पर्यंत एका ही क्षणांसाठी या राहूल ची झाली नाही. हळूहळू दोघांमधे प्रेमाची दरी वाढत गेली. त्याचा ही तोल सुटू लागला. आता शाब्दिक चकमकी झाडू लागल्या. कोणतेही छोटेसे कारण त्यांना भांडण करायला पुरेसे असायचं. बिचारा राहूल प्रेम ही मिळाले नाही, ना शरीरसुख. तो या बाबतीत कमनशिबी ठरला. ती प्रेमभंगाचा राग पती वर काढू लागली. खोटे आरोप नवर्यावर करू लागली. प्रकरण सासूबाई कडे गेले. तिनेही दुर्लक्ष केले. आपल्या मुलीच्या वाईट सवयी तिला ही माहित होत्या. पण " झाकली मूठ सव्वा लाखाची "म्हणून वरवर मखलाशी केली.मुलीला समजावले. पण थोड्याच दिवसात" ये रे माझ्या मागल्या. " वाद वाढत गेले. " तू माझे समाधान करू शकत नाही ".या एका शब्दाने नात्यात भयानक कटुता आणली .राहूल ला आठवलं "राहूल त्या शब्दाचा अर्थ शोधू लागला. " म्हणजे तिला आपण "शंढ" वाटलो काय? तो वेगवेगळे अर्थ लावू लागला. या शब्दाने भांडण पेटले. संजय आणि राहूल या दोन तरूणांनी तिच्या मनावर गारूड घातलं होते. ना ती संजय ला विसरू पहात होती ना राहूल या प्रियकराला. ऐन तारुण्यात ज्यांनी सुखाची बरसात केली त्या राजस प्रियकराला कसं विसरायचं? ती स्वतः हरवून जायची ते धुंद करणारे क्षण आठवायची त्या तारुण्याच्या लहरीवर स्वर व्हायची. पतीची मिठी कधी तरी संजयची वाटायची .ओढ्याकाठी ती स्वतः च संजय ला मिठीत घायची.संजय तिच्या मिठीत रममाण व्हायचा.राहूललाही तिच कवेत घ्यायची. राहूल ला पहिली मिठी पडली ती राणीची.मात्र या राहूलला कधी चुकूनही कवटाळले नाही. हा राहूल म्हणजे " बलात्कारी पुरूष अशीच तिची धारणा होती. कारण हा फक्त नि फक्त बलात्कारसाठीच जवळ येतो. बाकी कधी ढुंकूनही आपल्या कडे पहात नाही. त्याने तिच्याकडे यावे बोलावे असे होते का तरी. त्याला ही ती फक्त सुख घ्यायची ती सुखवस्तू वाटू लागली. आता नात्यात भलताच दुरावा निर्माण झाला होता. राणी त्याला नको वाटायला लागली. आपणांस ही स्त्री कधीच सुखी ठेवणार नाही. रोजरोजच्या भांडणाला तो आता कंटाळून गेला होता. काय करावे त्याला कळत नव्हतं. आपण फक्त हिला ओरबाडून घेतो असं हिला वाटते. जगण्यासाठी माणसाला शरीर सुख लागतेच पण त्याबरोबर आपुलकीने केसातून हात फिरवणारे हात पण लागतात. दोन प्रेमाचे शब्द पण लागतात. मायेने पाठीवर फिरणारा हात पण हवा असतो. शरीरसुख तर वेश्यापण देतात पण त्या मध्ये असतो फक्त व्यवहार एक भावना " मी शरीरसुख देते तू मला पैसे दे"की संपले नाते . मात्र पती पत्नीचे नाते हे अलौकिक नाते असते. येथे असते "समर्पण " त्याग असतो. व्यवहार तर मुळीच नसतो.एकाची मिठी दुस-याला मिठास देते. दोघांमधे विश्वासाचे नाते असते. राहूलला याची अनुभूती कधीच आली नाही. तो तहानलेला होता. निखळ प्रेमासाठी बाकी पत्नी कडून त्याच्या कोणत्याही आपेक्षा नव्हत्या. त्या आपेक्षा ती पूर्ण पण करणार नाही. कारण तो ठेवा तीने आपल्या प्रियकराला अर्पण केला होता. सारे लुटलेली ती कशी सुखी ठेवणार नव-याला.? लग्नाला वर्ष उलटून गेले. राणी अजून आपले प्रेम विसरली नव्हती. तिने प्रियकर राहूल चा शोध सुरू केला. तसा तो दूर नव्हता अडचण होती ती आईची. नव-याला तर ती कसपटा समान लेखत होती. नवरा म्हणजे आपल्याला पडलेले " दुस्वप्न " कारण सोडायची वेळ आली तर यू मिनिटांनी त्याला सोडणार होती मग डर कशाला? . आज तिला राहूल भेटणार होता. ती त्याला भेटायला खूप बेचैन होती. " आपलं पहिले प्रेम " म्हणजे राहूल, आपल्या तारुण्याची सर्वात मोठी निशाणी. ओंजळीत अवचित सापडलेला मोती .आपण कोणचीच होऊ शकत नाही. असे तिला वाटे.आज किती तरी दिवसाने ती राहूल च्या मिठीत होती .त्यांच्या स्पर्शासाठी ती असूसली होती. राहूल ही तहानला होता तो तर केंव्हा पासून या स्वर्गसुखची वाट पहात होता.मग काय ? त्यानेही तिला ओरबाडून घेतली.गोड असे विरळ क्षण. डोळ्यात साठवून ती घरी निघाली " बावलट नवरा घरी आला तर बचबाची नको " म्हणून घरच्या दिशेने वेगाने चालत होती. बस थांब्यावर ती बसची वाट पहात होती. चेह-यावर तृप्ती दिसत होती. भाण हरवलेले ती ; कुठे कशाचे भाण होते. अचानक कुणी तरी पाठीमागून डोळे झाकले. ती भाणावर आली. डोळ्यावर चा हात हातात घेतला.आणि पुन्हां हरवून गेली. तो हात तीच्या ओळखीचा होता. संजय तिचं दुसरं प्रेम. आज अवचित सुखाची रास चालून आली होती. आताच तृप्तीचा ढेकर देत ती बाहेर आली होती. आणि पुन्हा सुखाने आरास मांडली.ना ना करत ती संजय बरोबर अखेर गेलीच संजय म्हणजे तारूण्यात भेटलेला शारीराचे सोने करणारा पुरूष .तो येतो तेव्हा तिला ओरबाडून जातो.आज तो मोकळा जाईलच कसा ?. मनात नसताना ती त्याच्या स्वाधीन झाली. संजयने.पुन्हा तृप्तीचा ढेकर देत ती बाहेर पडली. संजय तीला बस स्टॉपवर सोडून निघून गेला.घाई घाईने तीने घर गाठलं.पण अजून नवरा आला नव्हता .तीने मोकळा श्वास घेतला.घाईत घाईत कपडे बदलले, टि.व्ही.चालूकरून चहा ठेवला. फ्रेश झाली .एव्हाना चहा झाला होता.वाफाळलेला चहाचा कप तोंडाला लावणार इतक्यात दारावरची बेल वाजली. दारात नवरा होता. विस्कटलेले केस,पायात चप्पल नव्हती. मळलेले कपडे, डोळे लाल .ती हबकून गेली.पायाखालची वाळू सरकली तीच्या. त्याने तिच्याकडे छद्मीपणे पाहिले. आणि तोल सावरत तो बेडरूममध्ये गेला.एव्हाना चहा थंड झाला होता. तिला राग आला पण बोलण्या अधिकार नव्हता. तो ती गमावून बसली होती. नवरा चार तासांपूर्वी आला होता. राणीची वाट पाहून तो निघून हातभट्टीच्या गुत्त्यावर गेला होता. बयकोवरचा राग दारूच्या बाटलीतून बाहेर काढत होता. आपली बायको कुठे गेले हे त्याला माहित नव्हतंच पण नात्यांची " लक्ष्मणरेषा "तीने पार केली होती.दारूने दुःख विसरता येते याची जाणीव त्याला झाली होती. त्याला मुक्तीचा मार्ग सापडलेला होता. दारू आपली उत्तम सहचारिनी होऊ शकते याची जाणीव झाली. आता तो अखंड बुडून लागला दारू त्याला " प्रयेसी "वाटू लागली. मात्र तो चुकून सुध्दा वाईट बोलता नव्हता नशेत तो शांत व्हायचा आगदी "स्थितप्रज्ञ "सारखा राणी फक्त पहात होती. तिला बोलता येत नव्हते. मनातून ती खाजील झाली. ....

       .. प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
               पोई कल्याण ठाणे
                     अध्यक्ष
       महाराष्ट्र साहित्य षरिषद पुणे
              (कल्याण ग्रामीण )
                      Copyright

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा