कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

गुरुवार, २२ डिसेंबर, २०१६

माझ्यातल कवी. कविता

माझ्यातला कवी

कधी झ-यातून वाही
कधी पाण्यातून येई.
माझ्यातला कवी.
घोट कवितेचे घेई.॥

थेंब पावसाचा झरे.
झाडाझाडात मढे.
माझ्यातला कवी.
शब्दाशब्दातून घडे.॥

अश्रुंचा फुटे बांध.
कधी रुसलेला चाॅद.
माझ्यातला कवी .
शब्दांत लावी सांध ॥

रान लेई नवासाज.
चढे झाडात उन्माद
. माझ्यातला कवी .
कवितेला घाली साद.॥

कुठे शेतकरी मरे.
कुठे आटलेत झरे .
माझ्यातला कवी .
शब्दा शब्दातून रडे.॥

✒ प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
              पोई ; कल्याण ; ठाणे
                    अध्यक्ष
       महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे
            (कल्याण ग्रामीण)
     djbutere@blogspot.com
                   21/13/16
           Copyright

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा