*मनाची पानगळ*
मन रानचं पाखरू
घडी घडी भरारते
मन शेत शिवारात
अंग अंग शहारते ॥
मन खोलवर डोह
त्यात तरंग आफाट
मन निळसर झाडी
मन चिंबचिब वाट.॥
मन नाद पावसाचा
मोरपंखी पानावर
मन करते गारूड
मोहरल्या रानावर.॥
मन पाखरांची गाणी
मन धुंद धुंद होई
मन दुष्काळग्रस्त
मन करपून जाई.॥
मन फुलांचा सुगंध
मन मोहरून जाई.
मन एकटं एकटं
मन पानगळ होई.॥
✒ *प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे*
पोई ; कल्याण ; ठाणे
*अध्यक्ष*
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे
(कल्याण ग्रामीण)
djbutere@blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा