वादळवाटा
स्वैर जगावे, ताठ कण्याने.
मोडून जाऊ, तोडून जाऊ.
वादळवाटा, तुडवित तुडवित
संकटांना पाठीवर घेऊ.॥
नकोत कसले बांध आडवे.
नकोत दारी कुंपण आगळे.
वादळ सारे अडवित जाऊ
हातात घेऊ मशाल सगळे ॥
जर का कोणी आडवा आला.
तयार व्हा तुम्ही तुडवायाला.
नव्या जगाचे मर्द मावळे.
वादळ व्हा रे उडवायाला. ॥
वादळ वाटा तुडवित जाऊ.
आपण सारे बहिणभाऊ.
लागलीच जर भूक आम्हाला.
वाघिनीचे दूध काढून पिऊ. ॥
प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
पोई कल्याण ठाणे
अध्यक्ष
महाराष्ट्र साहित्य षरिषद पुणे
(कल्याण ग्रामीण )
5/12/2016
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा