🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
*आई म्हणजे.......*
आई म्हणजे माती
रोपट्यासाठी झुरणारी
वादळाच्या घरात,
रोपट्यासाठी उरणारी.
आई जळती मशाल
अंधारात एकटी जळणारी
ओंजळभर प्रकाशनासाठी
वात होऊन जळणारी.
आई रानातील झरा
प्रदेश समृद्ध करणारा.
दूरवर वाहत जाऊन
पाऊस होऊन पडणारा.
आई पावसाची सर
झरझर झुरणारी
जमिनीच्या प्रेमापोटी
पाऊस होऊन पडणारी.
*प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे*
पोई कल्याण ठाणे
*अध्यक्ष*
महाराष्ट्र साहित्य षरिषद पुणे
(कल्याण ग्रामीण )
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा