चारोळी
1) तू यावे कातरवेळी
आणि मीठीत आकाश यावे
तू गूजगोष्टी करता
क्षितीजाला चुंबून घ्यावे ॥
2) तुझ्यावर लिहीताना,
मन कागदावर भरभर येते.
दुःखाच्या गावात,
मन सैरभैर फिरून येते ॥
3) तुझ्यावर लिहावं म्हटलं,
की शब्द रक्तबंबाळ होतात.॥
दुख-या मनाचे ,
काय गं हाल होतात.॥
4) माती म्हणे कुंभारा,
काय काय माझ्या नशिबात ॥
कोण अस्ती भरणार
तर कोण खापर घेऊन
फिरले गात गात. ॥
5) काय ते हात जादूई
मातीचे पुण्य फळा आणतात.॥
तिच माती आकार घेते
गाडगी मडकी तिची बनतात. ॥
6) थरथरत्या हातांना आता
तुझीच केवळ साथ हवी.॥
वृध्दपणाने छळले नुसते
त्यावर मजला मात्र हवी ॥
7) वेदनेला अंत नाही
जीवनात सुखाचा मेळ नाही. ॥
गाढवा सारखे जगतो.
जगण्यास वेळ नाही. ॥
8) सांजावतांना डोळे पाणावतात
नि क्षितीज काळे कुट्ट होते.॥
तुझ्या नुसत्या आठवणीने
माझी वेदना जन्म घेते.॥
9) तुझे नयन का रे छळती.
मी पहाते तुला त्याक्षणी.॥
का छळसी असा मुकुंदा
मी घायाळ पक्षिणी . ॥
10) आयुष्याचं झालय ओझं
ते फरफटत फरफटत नेते.॥
द्रारिद्रपण असं ना
ते पाठीवर बसून रहाते.॥
11) तुझा पैंजण सांगतो
माझा स्पर्श हवाहवासा असतो.॥
मग वेडा हात पायावरच
घुटमळतो बसतो ॥
12) भरलं घर आज
सुनं सुनं झालं.॥
लेक सासरला निघाली.
नि आभाळ भरुन आलं.॥
13) घरट्यात वाढलेले
पिल्लू आज उडणार आहे. ॥
अस्ताला जाणारा सूर्य
शोकात आज बुडणार आहे. ॥
14) कसं आठवू वेडे क्षण
काळजात कोरलेले॥
आज माझं कुणी
काळीज चोरलेले.॥
15) दिवस कसे बघ भरभर
समोरून रांगत गेले. ॥
: मला नाही तुझ्या ह्रदयात
घर बांधता आले. ॥
16) तुझ्या किलबिलाटाने
घर कसं जागे व्हायचे. ॥
शब्द रात भर डोळ्यात
जागे रहायचे॥
17) आभाळ भरून चांदण्या
आज एक ही हसत नाही ॥
माझं नक्षत्र आभाळ सोडून गेलंड
मी शोधते पण का बरं दिसत नाही. ॥
18) आभाळ भरून चांदण्या
आज एक ही हसत नाही ॥
: माझं नक्षत्र आभाळ सोडून गेलंड
मी शोधते पण का बरं दिसत नाही. ॥
19) तुझ्या ह्रदयी कोण रहाते ;
मी पहाणार आहे. ॥
तो गेल्यावर मी तिथेच
रहाणार आहे. ॥
20) आता तुझ्यावरचं प्रेम ,
उडत चाललंय. ॥
अस्ताला जाणा-या सूर्यासारखं
बुडत चाललंय. ॥
21) आभाळभर केली माया.
तुला कळलीच नाही. ॥
आता कशी लिहू अक्षरे
आता संपली ती शाई.॥
22) दारूड्यांचे बरं असतं
पिऊन दुःख तरी लपविता येते.॥
शिव्या हासडून काहीही
खपविता येते. ॥
श्री धनाजी जनार्दन बुटेरे
मु.पोई; पो.वाहोली.
ता.कल्याण ; जिल्हा. ठाणे
djbutere@rediffmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा