कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

सोमवार, ५ डिसेंबर, २०१६

प्रेम कविता

💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚
💜💜💜💜💜💜💜💜💜💜💜

*"पत्रामधली पाऊस"*

तुझं पत्र आलं की
पाऊस ही येतो.
डोळ्यांतील आख्खा गांव
भिजून चिंब होतो. ॥

गतकाळाच्या खुणा घेऊन
आठवणी येतात धाऊन.
पत्रामधली गुलाबी अक्षरे
ती ही जातात वाहून. ॥

पत्रामधले शब्द बिलोरी
करतात मनात घर.
मन सारे तरसून जाते
आभाळ भरते वर ॥

डोळ्यामधील चिंब वाटा
रस्ते होतात धुसर.
पुस्तकांतील मोरपिसाचा
तुला पडला विसर ॥

किती सरली वर्ष सखे
पत्र नाही आले.
पाऊस नेहमी येतो.
माझं गाव करतो ओले॥

पाऊस फितूर झाला
तुला मिठीत नाही घेत.
किती वर्षे सरली सखे
आठवण नाही येत? ॥

          ✒ प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
                 पोई ; कल्याण ; ठाणे
                           *अध्यक्ष*
               महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे
                     (कल्याण ग्रामीण)



💚💚💜💜💜💙💙💙💜💚💙
💚💚💜💜💜💙💙💙💜💚💙
💚💚💜💜💜💙💙💙💜💚💙

















प्रेम कविता हळूवार मनाचे भाव



प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे


1 टिप्पणी: