संपूर्ण जव्हार हे उंचावर वसल्यामुळे भौगोलिक दृष्टीने प्रदेश डोंगराल टेकड्या टेकड्यांचा आहे. भात हे मुख्य पिक घेतले जाते.अजून नाचणी हे पीक घेतले जाते. हेच यांचे मुख्य अन्न. मजुरी हा पारंपरिक पैसा मिळविण्याचे साधन.पण मजुरीसाठी ही कुटुंबा स्थलांतरीत होतात. मुंबई ,ठाणे ,कल्याण ,भिंवडी येथे हे मजूर स्थलांतर होतात. प्रश्न निर्माण होतो.मुलांच्या शिक्षणाचा.म्हणून बर्याच पालकांचा ओढा मुलांना शाळेत टाकताना आश्रमशाळेत आसतो.उद्देश रोजीरोटीसाठी बाहेर गेल्यावर मुलांची होणारी ससेहोलपट थांबावी एवढांच असतो. आश्रमशाळेत राज्यातील इतर शाळा मध्ये विद्यार्थी मिळत नाही पण जव्हार मधे आश्रमशाळेत प्रवेश मिळवणे जिकिरीचे होऊन जाते.स्थलांतरामुळे गांवामधे सुनसुनाट असतो.म्हातारे आणि लहान मुलें घरी दिसतात.
देश स्वातंत्र्य होऊन साठ पेक्षा जास्त वर्ष उलटली पण या भागात ना पाणी ना दळणवळणाच्या सुविधा ना रोजगार ना उच्च शिक्षणाच्या सुविधा, येथे विद्यार्थींना विज्ञानातून स्नातक व्हायचे असल्यास ठाणे कल्याण मुंबई गाठावी लागते. त्यामुळे कला शाखेत शिकणार्याची संख्या फार .असे कला शाखेत शिकून मजुरी करणार्या सुक्षितांची संख्या खूपच आहे. बारमाही शेती पावसाचे संकट त्यामुळे शेतीतूनही फार काही हाताला लागत नाही. हाताला पैसा नसल्यामुळे पुढील शिक्षण घेता येत नाही. कमालीचे द्रारिद्र त्यामुळे येथील जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करतात. आत्ता तर जंगल संपले आहेत. सर्वत्र ओसाड माळरानचे दर्शन होता आहे.
जव्हार तालुका हा नवीन तयार झालेल्या पालघर जिल्ह्यात समावेश झालेला शंभर टक्के आदिवासी. लोकसंख्या असणारा तालुका. याठिकाणी अपर उपजिल्हाधिकारी कार्यालय नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून. तात्कालिक सरकारसने निर्माण केले होते. नवीन जिल्हा तयार होताना जव्हार जिल्हा होणे अपेक्षित होते पण कोठे .या विषयावर राजकारण घडले. जव्हार तालुका राहिला.जर जिल्हा झाला असता तर सेवा सुविधांमधे भर पडून येथील आदिवासींच्या पदरात सुखसुविधा पडल्या असत्या. त्यानिमीत्ताने जिल्हा रुग्णालयात आले असते. आरोग्याचा प्रश्नांची तिव्रता कमी झाली असती.आज कुपोषणाचा प्रश्न येथील मोठी समस्या आहे. हाकेच्या अंतरावर जगातील एक महानगर मुंबई फक्त शंभर किलो मीटर अंतरावर आहे. मात्र येथे कुपोषणांने बालमृत्यू होतात ही निंदनिय गोष्ट आहे. पाण्याचे दुर्भिक्ष हे आसमानी आणि बरेचसे सुलतानी संकट.खरे तर येथे धो धो पाऊस कोसळत असतो. पण सरकारी अनस्ता नियोजन शून्यता यामुळे दूरवर पाण्यासाठी पायपीट करावी लागते.मजुरीसाठी जायचं की जगण्यासाठी पाणी आणायचे दोन्ही प्रश्न जीवन मरणाची समंधीत.कधी पाण्यासाठी महिलांना जीवही गमवावा लागला आहे. एका बाजूला रोजीरोटीचा प्रश्न तर दुसरीकडे. पाण्याचा प्रश्न अशा असंख्य प्रश्नांनी येथील नागरिक भरडला जात आहे.
खरेतर जव्हार हे ऐतिहासिक गाव. हे एक श्रीमंत संस्थान येथे विक्रम शहा नामक राजा राज्य करीत होता. छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेले ते या भूप्रदेशातून. भोपतगड हा एक भुईकोट किल्ला या संस्थानात होता त्याच्या पाऊलखुणा अजुनही साक्ष देतात. इतिहासात या गांवचा उल्लेख अनेक ठिकाणी सापडतो. असे हे संपन्न गांव. ठाणे जिल्हा चे महाबळेश्वर असे लोक म्हणतात. म्हणजे थंड हवेचे ठिकाण आहे. दिवसा याचा प्रत्येय येत नसला तरी. रात्री पडणारा सुखद गारवा शोधून सापडणार नाही. तसे गांव छोटेसे पण निसर्गसौंदर्याने नटलेला भूप्रदेश भोवती आहे. हनुमान पाॅईंट हे जव्हार मधिल सर्वात उंच ठिकाण आजुबाजूच्या निसर्गाचा अस्वाद घेण्याचे ठिकाण. येथून जव्हार च्या राजवाड्यांचे ही दर्शन होते. राजवाडे दोन आहेत. एक नवीन व दुसरा जुना राजवाडा.जुना राजवाडा नामशेष झाला आहे. हा लाकडी राजवाडा कलाकुसर केलेले खांब पूर्ण लाकडाने बाधलेला व वर मोगलोरी कौले आजूबाजूला दगडी तटबंदी असून ही खाजगी मालमत्ता आहे. राजेसाहेबांचे पुर्वजांच्या ताब्यात आहे. दसर्याला येथे मोठी जत्रात भरते.तेव्हा राज्याचे दर्शन नागरिकांना होते एरव्ही राजेसाहेब बाहेर रहातात.
posted from Bloggeroid
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा