कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०१६

"तुम्ही WhatsApp वर आहात काय?"

एखादा जुना मित्र अथवा ओळखीचा चेहरा दिसला की सहज एक प्रश्न विचारला जातो. "तुम्ही what's App वर आहात का ? झालं बोलणं आपोआप आखडलं जातं.पुढे आज उद्या काल भेटलेल्या मित्रा कडून "Hi" संदेश येतो.आपण पण हाय असा प्रतिसाद देतो.अधेमधे एखादा गुळमुळीत झालेला संदेश काॅपी पेस्ट करून धाडतो.समोरून ही मचूळ सगळ्या ग्रुप वर चोथा झालेली कविता येथे.पुढे अशीच गर्दी व्हाटस्अप वर वाढत जाते. नाती तयार होतात. वेगवेगळे ग्रुप तयार होतात. आपण त्या समुहाचे सदस्य होतो.येथे नवीन काय काहीच नसते.फेसबुकचे फोटो. येथे येतात येथून तेथे जाणार. काॅपी पेस्ट चा उद्योग जोरदार चालू आहे. "घरटे वादळ उडते.ही कविता माझी माझी म्हणून किती फिरली. शुभेच्छांना किंमत उरलेले नाही. तेच फोटो तेच शब्द काही समुहात अश्लीलता एवढी असते की सांगता सोय नाही. आपल्या ग्रुप वर पहिला दावा करणारे कुठून तरी आणून चिटकून टाकतात. याचे भाण याना नसते. मित्रहो माणसं जोडा संगळ्यांबरोबर बोला विचारांची देवाने घेवाण होऊद्या.प्रत्येकाचे विचार वेगळे आपण आपले विचार दुसर्यावर लादू नका. मी म्हणतो तेच खरे हा हट्ट सोडा.दुसर्याचे चांगले विचार त्यांच्या नावासह पाठवा .साहित्यचौर्य हा गुन्हा आहे. शेवटी खोटेपणा उघड होतोच. चांगल्या ग्रुप वर याची चर्चा होतेच. प्रत्येकाला आपला धर्म प्रिय आहे. कारण नसताना इतिहास दूषित करू नका. खोटं लिहून. या पुस्तकात असे लिहले आहे. याचे दाखले देवू नका.हसा आणि हसवा.अस्सल विनोदंची देवानघेवान करा मनोरंजक माहिती दुसर्यांना पाठवा. आफवा पसरून देवू नका. खात्री चे वृत्त पुढे पाठवा. परस्त्री माते समान मानून कोणत्याही अनोळखी महिलेची छायाचित्र,व्हिडीओ पोस्ट करू नका चुकीचा व्हयरल झालेला फोटो, व्हिडीओ रोखणे फार आवघड तेव्हा पोस्ट करतघ काळजी घ्या. विनोदाने पाठवलेला एक शब्द एखाद्या चे जीवन संपवू शकते. एखादा बदनाम होऊ शकतो हे विसरून चालणार नाही. व्हाटस्अप वर किती मित्र आहेत त्या पेक्षा ते कसे आहेत हे फार महत्वाचे. आपल्या व्हाटस्अप वर किती गर्दी आहे. या पेक्षा आपण नाती कशी सांभाळत आहोत याला महत्व आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा