कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०१६

जीवन सुंदर आहे. (2) भाग

सुख प्रत्येक गोष्टीत आहे. मदरतेरेसाना ते दीनदुबळ्यांच्या सेवेत सापडले.बाबा आमटेना महारोग्यांच्या सेवेत मिळाले. गाडगे महाराजांना समाजसेवेत सापडले. लता मंगेशकरांना गाण्यात सापडले. सिधुताई सकपाळ यांना निराधार मुलांनमधे गवसले.दुस-याला सुखी करून स्वतःही सुखी झाले. आपल्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. त्या आपणास सुखवादी बनवतात.कधी निराशा पदरी पडते.मग कपाळमोक्ष ठरलेला म्हणून समजा.चिमूटभर सुखासाठी माणूस आभाळभर सुखाची होळी करतो.आकाशातील चांदण्या हातात येत नसतात. त्या पाहून सुख मिळवा.राजा महालातून असतो पण तरी तो सुखी नसतो.खरं सुख गवताच्या झोपडीत असते. पैशात सुख मानणारा वर्ग फार मोठा आहे. पण पैसा दुःखाचे मूळ कारण आहे. पैशात सुख असते तर जगातील दहा श्रीमंत सर्वांत सुखी असते.पण तेमुळीच सुखी नाही. सुख हे क्षणभंगूर आहे. ते नश्वर आहे. दुःख माणसांचे सोबती आहे. कारण ते मानसाची पाठ सोडत नाही. प्रा. धनाजी जनार्दन बुटेरे - पोई कल्याण ठाणे 9930003930

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा