कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०१६

जव्हार समस्या चे आगार (2)

सनसेट पाॅईंट हे ठिकाण सूर्यात पहाण्याचे ठिकाण उंचावर असल्याने पावसाळ्यात आजूबाजूचा पाचूचा प्रदेश न्याहाळता येतो. केशव मुकणे हे संध्याकाळचा वेळ येथे व्याथित करीत.हे राजेसाहेबांचे पुर्वज होत. सनसेट पाॅईंट च्या बाजूला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटकासाठीचे निवासस्थान आहे. जव्हार मधिल वारली चित्रकला जगप्रसिद्ध आहे. अनेक कलाकार देशविदेशात जाऊन आपल्या कलेची जोपासना करतात. अजून विशेष म्हणजे जव्हार तालुक्यातील गावागावात भरणारे " बोहाडे " बोहाडा ही लोककला आहे. बोहाडा म्हणजे देवदेवतांची सोंगं काढून ती विशिष्ट संगीताच्या तालावर नाचतात.रामायण
महाभारत महिशासुरमर्दिनी आदी देवदेवतांची अवतरतात.यावेळी फार मोठ्या प्रमाणात जत्रात भरते.ही गावागावात परंपरा जोपासली जाते. भरसटमेट जव्हार येथे भरणार्या बोहाडा पाहण्यासाठी परदेशी पर्यटक येतात. लोक गरीब असली तरी सणउत्सवाचा आनंद मनमुराद लुटतात.
जव्हार पासूनच वीसबावीस किलो मीटरच्या अंतरावर " दाभोसा "हे छोटे गाव आहे येथे खूप मोठा पाण्याचा धबधबा आहे. पावसाळ्यात येथे सुटीच्या दिवशी तोबा गर्दी असते. येथे ही लांबून पर्यटक येतात.
असं हे जव्हार येथे लोक गरीब आहेत पण कामधंदा करून पोट भरतात.मंजुरीसाठी बाहेर जातात. आलेला पैसा आपल्या खलपटीला बांधून गरजे इतकाच खर्च करतात. आसमानी सुलतानी संकटाचा धैर्यानं तोंड देतात. या बद्दल त्यांची काही कुरबूर नसते. भांडणतंटे होतात पण गावच्या पंचांनी दिलेला निवडा देवाची आज्ञा म्हणून पालतात.कारण वाळीत टाकले जाण्याची भीती असते. गावागावत जात पंचायत असतात या पंचायतीत न्यायनिवाड्याचे काम करतात. खरे तर लोकांना कोर्टकचेरीच्या फेर्यातून सोडवतात.कारण कोर्टकचेरीच्या भांडणात पडण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नसतो या वेळी जातपंचायतीचा आधार मोठा असतो.हा न्याय बहुतेक करून सकारात्मक असतो. जाचक असे त्यामध्ये काही नसते.गावच्या अहिताची गोष्ट करणार्याला ती जाचक वाटते.
माझ्या सातआठ वर्षांच्या वास्तवात मला येथील आदिवासी संस्कृती समजून घेता आली.प्रत्यक्ष पहाता आली. लोकांशी बोलता आले त्यानां समजून घेता आले. हा प्रदेश पाया खालून घालता आला. आणि माझ्या विद्यार्थ्यांना बाहेर चे जग त्यांच्या समोर मांडता आले हे मी माझं भाग्य समझतो.जेंव्हा बदली होऊन पुन्हा परतीची वाटेला लागलो ते एक गरीब महाराष्ट्र डोळ्यात साठवत या गोड प्रदेशाचा जड अंतःकरणाने निरोप घेतला.
प्रा.धनाजी जनार्दन बुटेरे
मु.पोई, कल्याण
9930003930

posted from Bloggeroid

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा